Nagpur ATM News : नागपूरमध्ये एटीएममधून तब्बल ६०० रुपये अधिकचे येत होते. कोणी १००० रुपये काढल्यास १६०० रुपये येत होते, तर ५०० रुपयांवर ११०० रुपये बाहेर येत होते.
खापरखेडा येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी सायंकाळी पैसे काढण्यासाठी एक व्यक्ती तेथे पोहोचला. मात्र, जेवढे पैसे काढायचे होते, त्यापेक्षा ६०० रुपये जास्त निघाले. एटीएममधून ६०० रुपये जास्त निघत असल्याची बातमी लोकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. ६०० रुपये जास्त येत असल्याची माहिती मिळताच अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गर्दी करत होते. पैसे काढण्याचा हा क्रम बुधवारी रात्री ते गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सुरू होता.
या काळात लोकांनी हजारो रुपये काढून घेतले. प्रत्येक व्यक्ती घरातील सर्वच एटीएम घेऊन ॲक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढत होतं. १००० रुपये काढल्यावर १६०० रुपये, तर ५०० रुपये काढल्यावर ११०० रुपये एटीएममधून बाहेर येत होते.
१००० च्या जागी १६००, तर ५०० रुपयावर निघाले ११००; एटीएमबाहेर नागपूरकरांची एकच गर्दी
६०० रुपये अधिक येण्यामागे कारण काय?
दरम्यान, एटीएममधून जास्त पैसे निघत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून एटीएममध्ये उभ्या असलेल्या लोकांना हटवून एटीएम बंद केलं. महत्वाचं म्हणजे यापूर्वी १५ जून २०२२ रोजी याच एटीएममधून १००० रुपये जास्त येत होते. १००० रुपये काढताना २००० रुपये निघत होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैसे भरणाऱ्या कंपनीने १०० ऐवजी ५०० च्या नोटा ठेवल्या होत्या. त्यामुळे एटीएममधून जास्त पैसे निघत असल्याचं सांगण्यात येत आहे.