अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का; हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश

Abhishek Ghosalkar Mueder Case: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. हायकोर्टानं याबद्दलचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी दखलपात्र असल्यानं न्यायालयानं म्हटलं. घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाचा आदेश पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान तपासातील त्रुटींची दखल घेतली. फेब्रुवारी २०२४ मध्ये एका फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांची हत्या झाली. त्यांची हत्या केल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोन्हानं स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

abhishek ghosalkarabhishek ghosalkar murdermorris noronhamorris noronha firing abhishek ghosalkarmumbai crime newsअभिषेक घोसाळकर खूनअभिषेक घोसाळकर हत्याअभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडेमुंबई क्राईम न्यूजशिवसेना नेत्याची हत्या
Comments (0)
Add Comment