Supermoon : खगोलप्रेमींना यंदा सूपरमून दरम्यान खंडग्रास चंद्रग्रहण सुद्धा पाहायला मिळणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये शरद ऋतुत अवकाशात खगोलीय घटना घडतील. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येईल.
स्पेस.कॉमच्या रिपोर्टनुसार, पूर्ण हार्वेस्ट मून दरम्यान खंडग्रास चंद्रग्रहण पृथ्वीवरील उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिकेत दिसेल. तर अफ्रिकेतील पूर्वेकडील प्रदेशात दिसणार नाही. यासह आशिया, पश्चिम रशिया आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांमधून दिसेल.
सुपरमून’ किंवा ‘हार्वेस्ट मून’ ही खगोलीय व्याखा नाही. कारण शरद ऋतूतील पौर्णिमेत चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. या पोर्णिमेला चंद्र थोडा मोठा दिसतो. यंदाच्या वर्षात चार वेळा सुपरमूनची घटना अवकाशात घडणार आहे. यंदाच्या वर्षातील १७ तारखेला दिसणाऱ्या पोर्णिमेतील चंद्र हा दुसरा सूपरमून असेल जो पृथ्वीवरुन पाहता येईल. यावर्षात एकूण चार सुपरमूनच्या घटना होणार आहेत यातील सप्टेंबरचा सूपरमून दुसरा असेल. ऑगस्टच्या ब्लू मूननंतर दिसणारा हा पहिला सुपरमून आहे. “हार्वेस्ट मून” हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे याला कारण असे की शेतकऱ्यांच्या व्याखेतून त्याला हार्वेस्ट मून असे म्हटले जाते.
Chandra Grahan : खगोलप्रेमींसाठी पर्वणी! अवकाशात दिसणार ‘सूपरमून’ आणि खंडग्रास चंद्रग्रहण
प्राचीन काळात जेव्हा वीज नव्हती तेव्हा शेतकरी कापणीच्या हंगामात रात्री उशिरापर्यंत शेतात काम करण्यासाठी चंद्रप्रकाशावर अवलंबून राहायचे. शेतकऱ्यांना याच चंद्राच्या प्रकाशात काम करत राहावे लागायचे, म्हणून या पोर्णिमेला सूपरमून किंवा हार्वेस्ट मून असे बोलले जाते. शरद ऋतुत सूर्य उत्तरेकडून दक्षिण गोलार्धात संक्रमण करतो. हीच खगोल घटना शरद ऋतूची सुरुवात झाली असे दर्शवते. तसेच पीक कापणीचा हंगाम सुरु झाला असे सुद्धा सूचित करते.