Online Fraud : अनेकदा गुगलच्या मदतीने आपण अनेक जवळची ठिकाणी, सिनेमागृह, दवाखाने शोधत असतो. अशाच एका युवकाने गुगलवरुन आजारी आजोबांसाठी डॉक्टर शोधला पण तरुणाला तब्बल ९६ हजाराला गंडा बसला.
गुलशनने गुगल वरून घेतलेल्या नंबरवर कॉल केल्यावर, भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी त्याला समोरुन डॉक्टरांच्या भेटीसाठी फॉर्म भरावा लागेल असे सांगण्यात आले. फॉर्ममध्ये त्याचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, नाव आणि पत्ता यासह तपशीलवार वैयक्तिक माहिती भरुन घेण्यात आली. फॉर्म सबमिट केल्यानंतर, गुलशनला UPI द्वारे अपॉइंटमेंट फी भरण्याची सूचना करणारा कॉल आला.
गुलशन यांना अपॉइंटमेंट फी म्हणून गुगल पे द्वारे पाचशे रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले होते. यानंतर, त्याला त्याच्या बँक खात्यातून सर्वप्रथम 20,000 हजार आणि मग 10,000 हजारची सलग काढले जात आहेत असे संदेश मोबाईल वर येवू लागले, बँक खात्यातील एकूण ९६ हजार ९९८ रुपये खात्यातून कमी झाल्याचे गुलशनला आढळून आले. घाबरलेल्या गुलशनने त्वरीत बँकेशी संपर्क साधून त्याचे खाते गोठवले आणि शहडोल सायबर सेलकडे तक्रार दाखल केली.
गुलशन यांची तक्रार मिळाल्यानंतर, शहडोल सायबर सेलने तातडीने व्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आणि संबंधित बँकेशी संपर्क साधला. जलद कारवाईमुळे गुलशनला दिलासा मिळाला, आणि फसवूणक झालेली संपूर्ण रक्कम गुलशनला पुन्हा मिळाली, गुलशनने शहडोल पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले, तसेच ऑनलाईन फसवणूकीतील पैस परत मिळवून दिले याबद्दल सायबर पोलीसांचे आभार मानले.
Cyber Crime : ऑनलाईन डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावध व्हा! तुमचे बँक खाते होवू शकते रिकामे
शहडोलचे पोलीस अधीक्षक कुमार प्रतीक यांनी जनतेला ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार तात्काळ करण्याचे आवाहन केले. “सायबर गुन्हे आढळल्यास 1930 आणि NCRP पोर्टलवर त्वरित तक्रार नोंदवा. सायबर सेलला लगेच कळवा. सेक्सटोर्शन, बनावट व्यापार, बनावट कर्ज ॲप्स आणि ऑनलाइन गेमिंगशी संबंधित सायबर गुन्ह्यांपासून दूर रहा. गुगलवरुव संपर्क क्रमांक शोधणे टाळा. त्याऐवजी, संस्थेच्या अधिकृत आयडी किंवा वेबसाइटवरून क्रंमाक मिळवा.” अशी सूचना कुमार प्रतीक यांनी जनतेला केली.