आजचे अंकभविष्य, 7 सप्टेंबर 2024: धनसंपत्तीत वाढ, नवे प्रोजेक्ट मिळणार ! कोणत्या मुलांकावर असेल गणरायाचा वरदहस्त? जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 7 September 2024 : शनिवार, 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून विघ्नहर्ता गणरायाचा आशिर्वाद सर्व मुलांकांना मिळणार आहे. तुमच्या वाटेतील विघ्न दूर होणार असून जीवनात सुख समृद्धी मिळेल. मूलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमचे मन शांत करण्याचा प्रयत्न करा मूलांक 2 च्या जातकांनी वादविवादापासून दूर राहा. मूलांक 3 असणाऱ्यांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मूलांक 5 साठी दिवस चांगला असून नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. मूलांक 7 च्या लोकांची मेहनत जास्त होणार पण धनसंपत्तीत वाढ होणार आहे. मूलांक 9 असणाऱ्यांनी तब्येत सांभाळावी, जुने आजार डोके वर काढणार आहेत. या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 7 सप्टेंबर 2024: धनसंपत्तीत वाढ, नवे प्रोजेक्ट मिळणार ! कोणत्या मुलांकावर असेल गणरायाचा वरदहस्त? जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 7 September 2024: आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया, प्रत्येक मूलांकाला गणपती बाप्पाचा आशिर्वाद मिळेल. हा एकदंत, वरदविनायक तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठीच आलेला आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमचे मन शांत करण्याचा प्रयत्न करा कारण आज द्विधा मन:स्थीती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल.

मूलांक 2 – वादविवादापासून दूर राहा

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी दिवस ठिक आहे. आई-वडिलांकडून काही गोष्ट ऐकायला मिळणार आहेत त्यात तुमचे हित आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात किंवा चर्चेत तुम्ही अडकू नका. घरात शांतता आणि समाधान असेल तुम्ही घरच्या गोष्टींमध्ये आज अधिक रुची घेणार आहात.

मूलांक 3 – चिडचिड होण्याची शक्यता आहे

मूलांक 3 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. काही गोष्टींमुळे तुम्हाला अधिक राग येऊ शकतो आणि कुटुंबाशी कोणत्यातरी कारणाने दुरावा वाढू शकतो. कामाच्या क्षेत्रात लाभाच्या संधी असून आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.

मूलांक 4 – प्रवासाच योग, प्रवासात काळजी घ्या

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला आहे. घरातील वातावरण समाधानी असेल. तुमचा ताण तणाव हलका होईल. आज प्रवासाचा योग आहे फक्त तुम्ही प्रवास करण्यापूर्वी सर्व गोष्टींची काळजी घ्या. निष्काळजीपणामुळे काही नुकसान होणार नाही खात्री बाळगा. आज आर्थिक स्थिती उत्तम आहे. कुटुंबासाठी खरेदी करणार आहात.

मूलांक 5 – नवीन प्रोजेक्ट मिळणार

मूलांक 5 साठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात फायदा होणार असून एखाद्या मित्राकडून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. आज प्रवासाच योग आहे, प्रवास जरी लांबचा असला तरी काळजी करु नका, तुम्हाला त्याचा लाभ होईल.

मूलांक 6 – मनासारखे काम करण्याची संधी

मूलांक 6 साठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे एखादे काम करण्याची संधी मिळणार आहे. आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल ज्यामुळे तुमची कामे पटापट मार्गी लागतील. घरी वातावरण आनंदी असेल. तुम्ही सगळे मिळून संध्याकाळी फिरायला जाण्याचा योग आहे.

मूलांक 7 – धनसंपत्ती वाढ, मेहनत जास्त आहे

मूलांक 7 साठी आजचा दिवस खूप मेहनतीचा आहे. पैशांची आवक असेल, धन संपत्तीत वाढ होईल. कुटुंबातील प्रत्येत सदस्य आज तुमचे म्हणणे ऐकेल. कार्यक्षेत्रातील तुमचे. सहकारी मदतीसाठी तत्पर असतील. कामात वेळ लागेल पण कामे पूर्ण होतील.

मूलांक 8 – खर्च कमी करा

मूलांक 8 साठी दिवस थोडा खर्चिक असणार आहे. तुम्ही शक्यतो खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापारात नवीन संधीचा विचार करत असाल तर त्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. घरात वातावरण चांगले असेल, समाधान मिळेल.

मूलांक 9 – जुने आजार डोके वर काढणार

मूलांक 9 साठी दिवस आजचा फारसा ठिक नाही. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमजामुळे मदतभेद होण्याची शक्यता आहे. जुने आजार डोके वर काढणार आहेत तेव्हा काळजी घ्या. खाणे-पिणे व्यवस्थित असून दे, जंक फूड टाळा. मानसिक तणाव कमी होईल आणि कामे वाढणार आहेत.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

7 सप्टेंबर 2024 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 7 September 2024Numerology 7 September 2024 horoscopeNumerology Horoscope In Marathi 7 SeptemberToday's Numerology 7 September prediction September in marathitodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्यानोकरी मिळणार का?राशी भविष्य
Comments (0)
Add Comment