Megablock On Western Railway: पश्चिम रेल्वेवर ऐन गणेशोत्सवात मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने नागरिकांना मनस्ताप होणार आहे. पश्चिम रेल्वेवर नव्या सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना गणेशोत्सवात दिलासा देण्यात आला आहे. गणेशोत्सवात पहिल्या रविवारी कुठलाही ब्लॉक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. पण, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना ऐन गणेशोत्सवात ब्लॉक असल्याने मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वे शनिवारी मध्यरात्रीनंतर मेगाब्लॉक
स्थानक : गोरेगाव ते कांदिवली
मार्ग : अप-डाऊन धीमा व जलद
वेळ : शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १०पर्यंत
परिणाम : विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे १५० लोकल फेऱ्या पूर्णत: रद्द असणार असून, ५० फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे. चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान लोकल फेऱ्या गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर काही फेऱ्या थांबणार नाहीत. रविवारी सर्व मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. काही लोकल रद्द, तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर मध्यरात्रीनंतर ते पहाटेपर्यंत ब्लॉक
स्थानक : मशीद ते कुर्ला
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते रविवारी पहाटे ४.३०
Western Railway Block: मध्य-हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा, पश्चिम रेल्वेवर खोळंबा, रविवारी १० तासांचा ब्लॉक
परिणाम : ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.