गणेश चतुर्थीच्या आनंदावर विरजण, गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना BMW ने उडवलं, एकाचा मृत्यू

Mulund BMW Hit And Run On Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलुंड येथे गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना एका बीएमडब्ल्यूने जोरदार धडक दिली, यामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: मुंबईत सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचा उत्सव असताना मुलुंडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मुंबईतील मुलुंड येथे हिट अँड रनची भीषण घटना घडली आहे. या अपघातात एका बीएमडब्ल्यू कारने गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना उडवलं आहे. या अपघातात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मुलुंड परिसरात रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना या बीएमडब्ल्यू कारचालकाने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचालक पसार झाला आहे. पहाचे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

कार्यकर्ते बॅनर लावत असताना BMW ची धडक

मुंलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते बॅनर लावत होते. मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरडवळ हे दोथे बॅनर लावत होते. हे दोघे बॅनर लावत असताना अचानक एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगात आली आणि या दोन्ही कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. ही बीएमडब्ल्यू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती, तेव्हा ही घटना घडली.

प्रीतम थोरातचा जागीच मृत्यू, प्रसादची प्रकृती गंभीर

धडक दिल्याने हे दोन्ही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. पण, अपघात झाल्यानंतर हा बीएमडब्ल्यू चालक थांबला नाही तर तो मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. या अपघातात प्रीतम थोरातचा मृत्यू झाला आहे तर प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

या अपघातात प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला होता, तर प्रसाद पाटील जखमी झाला होता. या दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी प्रीतमला मृत घोषित केलं, तर प्रसादची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलिसांनी याप्रकरणाची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. त्या बीएमडब्ल्यू चालकाचा शोध सुरु आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

ganesh mandal workers hit by bmwhit and run casehit and run ganesh chaturthimulund hit and runmumbai crimemumbai mulund hit and runबीएमडब्ल्यूने गणेश कार्यकर्त्यांना उडवलंमुंबई हिट अँड रन गणेश चतुर्थीमुलुंडमध्ये गणेश कार्यकर्त्यांना उडवलंमुलुंडमध्ये हिट अँड रन
Comments (0)
Add Comment