Nanded Crime News: हिंगोली गेट आल्यानंतर तीने ऑटोचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले असता त्याने ”तुला भोकरपर्यंत सोडतो, पैशांची काही काळजी करु नको”, असं म्हणत तो ऑटो भरधाव वेगाने नेऊ लागला.
हायलाइट्स:
- नांदेडमध्ये मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
- नियोजितस्थळी न जाता ऑटो भलत्याच रस्त्याकडे वळविला
- प्रसंगावधान राखून धावत्या ऑटोतून मुलीची उडी
हिंगोली गेट आल्यानंतर तीने ऑटोचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले असता त्याने ”तुला भोकरपर्यंत सोडतो, पैशांची काही काळजी करु नको”, असं म्हणत तो ऑटो भरधाव वेगाने नेऊ लागला. ऑटो चालकाने हिंगोली गेट येथे आल्यानंतर ऑटो थांबवून विद्यार्थिनीला उतरू देणे आवश्यक होते. परंतु त्याने तसे न करता ऑटोचा वेग वाढवला आणि ऑटो देगलूर नाकाच्या दिशेने पुढे नेत होता. विद्यार्थिनीने ऑटो थांबवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतरही ऑटो थांबवण्याऐवजी त्याचा वेग वाढवत होता. ऑटोचालक जोरात ऑटो चालवत असल्याचे पाहून घाबरलेल्या अवस्थेतही विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून मोठे धाडस दाखविले. मुलीने ऑटोतून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. विद्यार्थीनीने दाखवलेल्या धैर्याचे मात्र घटनास्थळावर कौतुक केले जात आहे.
नागरिकांनी ऑटो चालकाला दिला चोप
विद्यार्थिनीच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर जमावाने शेख नसिर ऑटो चालकाला घटनास्थळी चांगलाच चोप दिला. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर वजीराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या ऑटोच्या नंबरप्लेटवर काळ्या चिकटपट्ट्या लावण्यात आल्या. त्यामुळे त्याचा काय उद्देश असेल, अशी शंका व्यक्त करण्यात आली.