Chhatrapati Sambhajinagar Sandipan Bhumre and Chandrakant Khaire Clashes: नंदकुमार घोडेले यांनी मंत्री अतुल सावे, खासदार भुमरे यांच्या अगोदर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव घेतलं. यावरून भुमरे चांगलेच संतापले.
हायलाइट्स:
- ”हा घरचा कार्यक्रम नसून सार्वजनिक कार्यक्रम आहे”
- ”प्रोटोकॉल पाळत नाही असं म्हण”
- चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांच्यामध्ये हमरी तूमरी
Chhatrapati Sambhajinagar: आधी नाव कुणाचं? बाप्पाच्या उत्सवात दोन शिवसेना नेत्यांमध्ये हमरीतुमरी, खैरे-भुमरे भिडले!
Mumbai Hit And Run: गणेश चतुर्थीच्या आनंदावर विरजण, गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना BMW ने उडवलं, एकाचा मृत्यू
नंदकुमार घोडेले यांनी मंत्री अतुल सावे, खासदार भुमरे यांच्या अगोदर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव घेतलं. यावरून भुमरे चांगलेच संतापले. ”हा घरचा कार्यक्रम नसून सार्वजनिक कार्यक्रम आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रोटोकॉल पाळा”, असा दम संदिपान भुमरे यांनी घोडेले यांना दिला. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले ”प्रोटोकॉल पाळत नाही असं म्हण”. त्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघत संदिपान भुमरे यांनी काहीतरी शब्द उच्चारले. यावेळी खैरे म्हणाले ”आता चूप बस” त्यावर भुमरे म्हणाले ”अय बोलायचं नाही…बोलायचं नाही…” असं म्हणत नंदकुमार घोडेले यांना म्हणाले देवाच्या ठिकाणी असं करायचं नाही. त्यानंतर व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला.