विधानसभेसाठी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, मविआमध्ये पक्षाचे एक पाऊल पुढे, १७२ मतदारसंघांचा आढावा पूर्ण

Congress Preparations For MH Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र काँग्रेसची विशेष बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून पक्षाकडून आतापर्यंत १७२ जागांचा आढावा घेतल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र काँग्रेसची विशेष बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून पक्षाकडून आतापर्यंत १७२ जागांचा आढावा घेतल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदारसंघांचा आढावा पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील वातावरण मविआसाठी अनुकूल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत चेन्निथला यांनी ही माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे. हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचारांत वाढ झालेली आहे. पुण्यात तीन दिवसांत दोन हत्या झाल्या. महागाई आवाक्याबाहेर गेल्याने सण साजरे करणे अवघड झाले आहे. जनता त्रस्त आहे. पण महायुती सरकार मात्र घोटाळे करून पैसे वसुल करण्यात व्यग्र आहे,’ अशी टीका चेन्निथला यांनी केली.
Aaditya Thackeray: महायुतीकडे CM पदासाठी कोणाचा चेहरा? ते तर योजनेच्या क्रेडिटवरुन भांडतात, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

‘महाराष्ट्राला सापत्न वागणूक’

‘मराठवाडा व विदर्भात पुराने थैमान घातले असून १२ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते, पुल वाहून गेले, परंतु केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पूर आल्यानंतर दोन केंद्रीय मंत्रालये तैनात करण्यात आली. कृषी मंत्री व अर्थमंत्री तातडीने मदत मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप केंद्राचे पथकही आले नाही, केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक का देत आहे?’ असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Congressmh vidhan sabha electionNana Patoleramesh chennithalavidhan sabha constituencyकाँग्रेस पक्षाची विधानसभेसाठी तयारीनाना पटोलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकरमेश चेन्नीथलांची माहितीविधानसभा मतदारसंघांचा आढावा
Comments (0)
Add Comment