Ajit Pawar : शरद पवारांना सोडणं ही माझीच चूक, अजित पवारांनी दिली कबुली

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 8:31 pm

ajit pawar vs sharad pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज (7 सप्टेंबर) रोजी गडचिरोलीमध्ये दाखल झाली आहे. आयोजित केलेल्या सभेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना सोडणं ही माझीच चूक होती असं म्हणत आपली कबुली दिली आहे. त्यामूळे अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज (7 सप्टेंबर) रोजी गडचिरोलीमध्ये दाखल झाली आहे. आयोजित केलेल्या सभेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना सोडणं ही माझीच चूक होती असं शरद पवारांचं नाव न घेता आपली कबुली दिली आहे. त्यामूळे अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ” वडिलांचं जितकं लेकीवर प्रेम असतं तितकं प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही जर घरात फुट पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरोबर नाही. समाजाला सुद्धा ते आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. तसेच झालेली चूक सुद्धा मी मान्य केली आहे. अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
Chhagan Bhujbal : श्री गणेशा! महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, छगन भुजबळांचं बाप्पाला साकडं

तिला बाबांच्या विरोधात उभं राहणं शोभतं का?

अजित पवार पुढे म्हणाले की, ” धर्माराव बाबांच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केला आहे. ती आता बाबांच्या विरोधात उभी राहणार असल्याची म्हणते. हे शोभतं का? परंतु तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. वस्ताद सगळे डाव शिकवत असतो पण एक डाव स्वत:साठी राखून ठेवत असतो. तो डाव दाखवून देण्याची वेळ कधीही आणून देऊ नये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबाच्या मागे उभे रहा आणि त्यांना निवडून आणा” असं अजित पवार म्हणाले आहेत.

आम्ही चांगल्या योजना जनतेला देण्याचा प्रयत्न केला

अजित पवार म्हणाले की, ”आम्ही चांगल्या योजना जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मुलींसाठी एक योजना आणली आहे. या योजनेनुसार मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला 1 लाख रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना 3 हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. जे कोणी राहिले आहेत. त्यांनी सुद्धा अर्ज करावा”. असं अजित पवार म्हणाले आहेत

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करण्याच्या घटनेला वर्षपूर्ती झाली आहे. शरद पवार यांच्यातून बाहेर पडल्यामुळे अजित पवार यांना लोकसभेत अपयश आलं अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु आज खुद्द अजित पवार यांनी आपली चूक झाल्याची कबुली दिली आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Ajit Pawar Newsajit pawar on sharad pawarMaharashtra politicsअजित पवार आणि शरद पवारअजित पवार जन सन्मान यात्राअजित पवार बातम्याअजित पवारांनी दिली कबुलीउपमुख्यमंत्री अजित पवारशरद पवारांना सोडणं ही माझीच चूक
Comments (0)
Add Comment