Raja Raut on Manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत ठाम राहावं किंवा राजकारण करायचं असेल तर थेट राजकारण करावं असं म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
महाविकास आघाडीतल्या पोटातील जरांगे यांच्या ओठावर आलं
बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. बार्शीतल्या मराठा बांधवाची आणि जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर राजा राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणारे मराठा बांधव हे महाविकास आघाडीमधील बार्शी तालुक्यातील नेते आणि पदाधिकारी होते. त्यांना मी चांगले ओळखतो अशी माहिती राजा राऊत यांनी दिली आहे.
जरांगे पाटील यांनी बोलताना त्या राऊत पेक्षा सोपल बरा, यावर राजा राऊत यांनी बोलताना टीका केली. महाविकास आघाडीच्या पोटातील वाक्य जरांगे पाटील यांच्या ओठावर आले. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या राजकारणाचा गंध येऊ लागला आहे, अशी शंका राजा राऊत यांनी उपस्थित केली.
राजकारण करायचे असेल तर थेट राजकारणात उतरावं, आरक्षणाच्या आड राहून राजकारण नको; जरांगेंना आमदाराचा सल्ला
मनोज जरांगेच्या सभांना महाविकास आघाडीची गर्दी असते
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात ३१ खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यांच्याकडून तरी लिहून घ्या, अशी विनंती राजा राऊत यांनी केली आहे. विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीमधील नेते विविध आंदोलने करतात, मोर्चे काढतात, मग मराठा आरक्षणाकडे झुकतं माप कशाला देत नाहीत असा सवालही राजा राऊत यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुका आहेत म्हणून तुम्ही सभा घेत फिरत आहात, तुमच्या सभांना फक्त महाविकास आघाडीची गर्दी दिसून येत आहे, असा आरोपही राजा राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.