आमदारकीसाठी देवकाते आणि वैराट समर्थक अजितदादांकडे, जोरदार घोषणाबाजी, कोणाची वर्णी लागणार?

Ajit Pawar News: अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना विश्वास देवकाते आणि भगवानराव वैराट यांच्या समर्थकांचं शिष्टमंडळ अजितदादांकडे पोहोचले. आमच्या नेत्यांना आमदारकी द्या, विधान परिषदेवर आमदार करण्याची मागणी त्यांनी दादांकडे केली.

Lipi
अजित पवार
दीपक पडकर, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दरबार सुरु असतानाच आज सकाळी बारामतीतील कसबा येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बारामती तालुक्यातील एक शिष्ट मंडळ पोहोचले. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवर आमदार करा अशी मागणी करणारे एक शिष्टमंडळ होते, तर दुसरे वाई तालुक्यातील सुपुत्र आणि पुणेसह राज्यभरात झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख असलेले भगवानराव वैराट यांना ही विधान परिषदेचे आमदार करा, अशी मागणी करणारी दोन शिष्टमंडळे बारामतीत पोहोचली होती.

या शिष्टमंडळाने अजित पवारांसमोर शक्तिप्रदर्शन केले. गेल्या अनेक दिवसांपासून विश्वास देवकाते पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्या, अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. मात्र, मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे ही मागणी थोडी थांबली. मात्र, आता विधानसभेच्या तोंडावर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

या संभाव्य नियुक्तीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत. दोन दिवसांपूर्वीच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर संधी मिळणार आहे. असे दिसताच रूपाली ठोंबरे आणि इतरांनी त्याला आक्षेप घेतला.

राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारचे अंतर्गत वाद सुरू असतानाच आता धनगर समाजातून धडाडीचे असलेले नेते विश्वास देवकाते पाटील यांना विधान परिषदेला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी करत त्यांचे समर्थक आज राष्ट्रवादी भवनवर पोहोचले. दुसरीकडे, वाई तालुक्यातील बोपर्डीचे सुपुत्र व राज्यभरातील झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख भगवानराव वैराट यांनी देखील खूप दिवसापासून आता साहेब थांबले आहेत. त्यांना आता विधान परिषदेची संधी द्या, अशी मागणी करणारे त्यांचे समर्थक अजित पवारांकडे पोहोचले.

एकूणच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा वाटा जितका आहे. त्यामध्ये या दोघांना संधी मिळाली पाहिजे. अशी आक्रमक आणि आग्रही मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. या समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे आज राष्ट्रवादी भवन घोषणांनी दनादून गेले.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

ajit pawarbhagvanrao vairatmla appointed by governor on vidhan parishadvishwas devkateअजित पवार कार्यकर्ते मागणीअजित पवार बातम्याबारामतीराज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य
Comments (0)
Add Comment