Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त

Vidhan Sabha Elections 2024: तुमचे आशीर्वाद मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या शिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, तरी इतका मोठा निधी देत आहे, जर मुख्यमंत्री झाले तर किती मोठी ताकद आपल्या देणार, असंही ते म्हणाले.

Lipi
देवेंद्र फडणवीस
जितेंद्र खापरे, नागपूर: आगामी निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे. ते भगवान श्री. चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त आयोजित कार्क्रमात बोलत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मंचावर उपस्थित होते.

राज्यातील विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी त्याआधीच राजकारण शिगेला पोहोचले आहे. प्रत्येक पक्ष आपलाच मुखमंत्री होणार असा दावा करत आहे. यातच भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांचा या वक्तव्याने महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

महानुभव पंथीयांच्या मागण्या फडणवीसांनी मान्य केल्या – परिणय फुके

परिणय फुके म्हणाले, महानुभाव पंथीयांची जेही मागणी होती, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. ज्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी दोनशे एकोणतीस कोटींचे रिद्धपूरला मराठी विद्यापीठाची घोषणा केली. २३९ कोटींचा आराखडा तयार केला. मात्र, त्यानंतर सरकार बदलले आणि सर्वच कामं थांबली. त्यानंतर सरकारमध्ये परतल्यानंतर त्यांनी निधी देऊन ते कामं परत ते कामं सुरु केलं.

Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त

पुढे बोलताना फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब आता उपमुख्यमंत्री आहे, तरी इतका मोठा निधी आपल्या पंथीयांना देत आहे. साहेब मुख्यमंत्री झाले किती मोठा निधी आणि किती मोठी ताकद आपल्या देणार आहे. तसेच, आपल्या दोन्ही हातांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि तुमचा पूर्ण ताकतीने एक कोटी महानुभाव पंथी महाराष्ट्रात आहेत. जर या एक कोटी महानुभाव पंथी यांनी देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद दिला तर पुढच्या निवडणुकीत त्यांना “मुख्यमंत्री” बनण्यापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. तसेच, आधी फडणवीस साहेबांचा वेळ होता त्यांनी भरभरून दिलं, पुढल्या दोन महिन्यानंतर आपला वेळ येणार आहे. आज परतफेड करण्याची वेळ आलेली आहे, असेही माजी मंत्री परिणय फुके म्हणाले.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

BJP newsdevendra fadnavis marathi batmyaDevendra Fadnavis Newslatest marathi newsmarathi newsNagpur newsदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवोपरिणय फुकेविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment