ऐन सणासुदीत तिहेरी हत्याकांड; पती, पत्नीसह मुलाचा खून, रायगडमध्ये खळबळ; तपास सुरु

Raigad Crime News: रायगडच्या कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कर्जत: ऐन गणेशोत्सवात कर्जत तालुक्यात तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. आज सकाळी साडे आठ-नऊच्या सुमारास एकाच कुटुंबातील तीन लोकांची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिकन पाडा परिसरात घडली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

मदन जैतु पाटील वय (३५ वर्षे), त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी अनिशा मदन पाटील (वय ३० वर्षे) आणि त्यांचा १० वर्षांचा मुलगा विनायक मदन पाटील अशी मृतांची नावं आहेत. सणासुदीच्या काळात ही घटना घडल्यानं आसपासच्या भागात खळबळ उडाली आहे. या तिघांचे मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून या ठिकाणी मयत मदन पाटील यांच्या नातेवाईक यांच्यासहित नागरिकांनी गर्दी केली आहे. मदन पाटील अंदाजे वीस वर्षापासून चिकन पाडा येथे राहण्यास आहेत. तिहेरी हत्याकांडाचा तपास पोलीस करत आहेत.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

karjat triple murder newsraigad crime newsraigad newsraigad triple murderकर्जत तिहेरी हत्याकांडतिघांची हत्यातिहेरी हत्याकांडरायगड क्राईम न्यूजरायगड तिहेरी हत्याकांड
Comments (0)
Add Comment