Manoj Jarange : आपला लढा अंतिम टप्प्यात, सरकारसमोर पर्याय नाही, जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Sept 2024, 6:57 pm

maratha reservation : बीडमधील परळी वैजनाथ येथे घोंगडी बैठक पार पडली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी (8 सप्टेंबर) बीडमधील परळी वैजनाथ येथे घोंगडी बैठक पार पडली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.

आपला लढा अंतिम टप्प्यात

जरांगे पाटील म्हणाले की, ”आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. म्हणून या घोंगडी बैठकीचे आयोजन केले जात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आरक्षणापासून मराठ्यांचे एकही घर वंचित राहिले नाही पाहिजे. आपला लढा अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे. सरकारसमोर आता पर्याय नाही. माझा जीव आरक्षणात आहे तर सरकारचा जीव सत्तेत आहे.”

देवेंद्र फडणवीसांनी सापळा रचला आहे

जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही. देवेंद्र फडणवीसांनी सापळा रचला आहे.चार दिवसाला नवीन बैल येतो. मी फडणवीसांना एकच सांगतो मराठ्यांचा नाद सोडून द्या,नाहीतर राज्यात भाजपा राहायचं नाही”. असं जरांगे म्हणाले आहेत.
Pune : दुसऱ्या लिफ्टने जा, असं म्हणताच डिलिव्हरी बॉयकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण

लाडकी बहिण योजनेवरून हल्लाबोल

जरांगे पाटील यांनी लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”तुम्ही तात्पुरत्या योजना कशा करता आणता? त्याऐवजी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांना 24 तास लाईट द्या, जे पाहिजे ते सरकार देत नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याऐवजी आयुष्यभराच्या सुविधा द्या.”

उपोषणाने माझ्या शरिराचे वाटोळे झाले

जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ”उपोषणाने माझ्या शरिराचे वाटोळे झाले आहे. तरी मी लढतोय. तुमच्या लेकरांसाठी लढतोय तुम्ही हारू देऊ नका. वेळ पडल्यावर मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. तुम्ही जातीला हरू देऊ नका”. असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे आता निवडणुकीआधी राज्य सरकार काही निर्णय घेतयं का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

beed batmyajarange patil yanchi ghongdi baithakmanoj jarange patilआपला लढा अंतिम टप्प्यात सरकारसमोर पर्याय नाहीजरांगे पाटलांचा राज्य सरकारवर हल्लाबोलजरांगे पाटीलजरांगे पाटील बैठकबीड बातम्यामराठा आरक्षण​ TOPIC
Comments (0)
Add Comment