Baramati Ajit Pawar Speech: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षातील गटबाजी बंद करण्यासाठी बारामती विधान सभेसाठी पक्षनिरीक्षकाची नेमणूक केली आहे.
हायलाइट्स:
- माझं ऐकत नाहीत, फार शिकवायला जाऊ नका
- बारामतीकर कोलतील….
- अजितदादांची तुफान फटकेबाजी
”महाराष्ट्र राज्याचा पाचवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही. कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका आणि यश अवलंबून असते. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून माझ्या जिवाभावाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी साथ दिली, मला प्रेम दिलं. माझ्यावर विश्वास दाखवला १९८४ सालापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत मला तुमच्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी कामाची संधी मिळाली. मी महाराष्ट्रात फिरत असताना जाहीरपणे सांगत असतो की, मुख्यमंत्री पदाबाबत इतरांचं मला माहित नाही. परंतु पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड तोडू शकत नाही”.
”कार्यकर्त्यांच्या जीवावरच पक्ष चालतो. कार्यकर्ता हा पक्षाचा दूत म्हणून काम करत असतो. कोणताही कार्यक्रम असो, तो यशस्वी करण्यामध्ये कार्यकर्त्यांचे योगदान असते. कार्यकर्ते हेच कोणत्याही पक्षाचा कणा असतात. पक्ष सक्षम होण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. त्यामुळे मी सुद्धा कार्यकर्ता कसा सक्षम होईल याचा प्रयत्न करत असतो. मी बारामतीत काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले. परंतु त्यामुळे त्यांची जबाबदारी संपली असे होत नाही. त्यांनी पक्ष वाढीसाठी लक्ष दिले पाहिजे”, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.