सोमवार ९ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १८ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल षष्ठी रात्री ९-५२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा सायं. ६-०३ पर्यंत, चंद्रराशी: तूळ सकाळी ११-२७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
विशाखा नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यांनतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग रात्री १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांपर्यत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र सकाळी ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत तुळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२६
- सूर्यास्त: सायं. ६-४५
- चंद्रोदय: सकाळी ११-२०
- चंद्रास्त: रात्री १०-३२
- पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ३.७६ मीटर, दुपारी २-५५ पाण्याची उंची ३.५४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-३३ पाण्याची उंची १.९९ मीटर, रात्री ८-५४ पाण्याची उंची १.११ मीटर
- सण आणि व्रत: सूर्यषष्ठी, श्रीबलराम जयंती, कार्तिकेय दर्शन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २३ मिनिटांपासून ते ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३३ मिनिटांपासून ६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपासून ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपासून ते १ वाजून ३३ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
गंगाजल आणि तीळ एकत्र करून शिवपींडीवर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)