Pm Modi Sabha In Vidarbha : वर्धामध्ये मोदीच्या सभेसाठी अवैध मुरूम उत्खनन सुरु आहे असा आरोप कराळे गुरुजींनी केला आहे. एका दिवशी बिना रॉयल्टीने ५०० – ५०० ट्रकची वाहतूक सुरू आहे हे लक्षात येताच कराळे मास्तरांनी ट्रक अडवून धरले.
नितेश कराळेंनी अडवले ट्रक
कराळे मास्तर पुढे म्हणाले, पीएम मोदींच्या एका दिवसाच्या सभेसाठी प्रशासनाने लोकांच्या टॅक्सच्या पैशांची उधळण पट्टी लावणे सुरू केली आहे. स्वावलंबी ग्राउंडच्या मैदानावर एक तासाच्या मोदींच्या सभेसाठी करोडो रुपयांची उधळपट्टी प्रशासन करणार आहे का? जर एखाद्या व्यक्ती आपल्या शेतातील विहिरीचा मुरूम घरी घेऊन जात असेल तर त्याला सुद्धा परवानगीची गरज पडते. एखाद्या व्यक्तीने सरकारी जागेवरचा मुरूम आपल्या घरी आणला तर त्याची गाडी जप्त करून १ ते २ लाखांचा दंड आकारण्यात येतो. मग ६ सप्टेंबर पासून तर ८ सप्टेंबर पर्यंत जवळपास १०,००० ब्रास बिना रॉयल्टी मुरूम टाकण्यात येत आहे. म्हणजे महसूल प्रशासनाचा जवळपास तीन ते चार करोड रुपये रुपयाचे नुकसान झाले असे नितेश कराळे म्हणाले याच बाबी लक्षात घेत कराळेंनी ट्रक अडवले.
पोलीसांची कराळे मास्तरांना धमकी!
मुरुम वाहत असलेले सर्व ट्रक ओवर लोडिंग होते त्यातील काही गाडीचे काल मर्यादा संपली होती. जर अशा गाडीने कोणाचा अपघात झाला किंवा कोणाच्या जीविताला हानी झाली तर त्याची जबाबदारी प्रशासना घेईल का? म्हणून याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी गाड्या अडवून रॉयल्टी चेक केली तर कोणत्याही गाडी जवळ रॉयल्टी नव्हती आणि काही गाड्याकडे कागदपत्र सुद्धा नव्हते. काही गैरप्रकार घडू नये म्हणून सर्व गाड्यांची विचारपूस केली तर सर्व गाडी मालक नितेश कराळे सर यांच्या यांच्यावर मारण्यासाठी धावून गेले. पोलीस प्रशासनासमोर त्यांनाच अरेरावी करत होते. कराळे सरांना त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या ट्रक मालकाची बाजू घेत कराळे सरांना अटक करण्याची धमकी दिली. पुढे सर्व मुरूम वाहत असलेल्या गाड्या तिथून पोलीसांनी सोडून नेल्या.