भाजपने ‘निम्म्याहून जास्त’ जागांचा हट्ट सोडला, विधानसभेला नवे मिशन, खात्री फक्त ५० चीच

BJP Mission 125 for Vidhan Sabha : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स
देवेंद्र फडणवीस
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार राज्यात १२५ जागा जिंकण्याचा निश्चय भाजपने केला आहे. यातील जवळपास ५० जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

७५ जागांसाठी बैठकीत रणनीती

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशी रविवारी रात्री उशिरा चर्चा केल्याचे समजते. भाजपला कठीण जाण्याची शक्यता असलेल्या ७५ जागांसाठी बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. शहा यांनी अंधेरी येथील सहारा स्टार हॉटेलमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली.

‘लालबागच्या राजा’चे आज दर्शन घेणार

शहा सोमवारी सकाळी १०.४५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर ११.१५च्या सुमारास शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर दुपारी १२.१० मिनिटांनी ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेणार आहेत. तसेच १२.५० मिनिटांनी ते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील.
Mahayuti Seat Sharing : मुंबईतील निम्म्या जागा हव्या, शिवसेनेचा भाजपकडे आग्रह, १३ जागांवर थेट ठाकरेंना भिडण्याचा चंग

महायुतीच्या सर्व नेत्यांना सुबुद्धी दे

दुसरीकडे, कुठल्याही प्रकारचा वाद होईल अशी वक्तव्य नेत्यांकडून होऊ नयेत यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांना सुबुद्धी दे, असे साकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गणपती बाप्पाला घातले आहे. राज्यात यावेळी सहा प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असे होणारच असल्याचेही ते म्हणाले.

BJP Mission for Vidhan Sabha: भाजपने ‘निम्म्याहून जास्त’ जागांचा हट्ट सोडला, विधानसभेला नवे मिशन, खात्री फक्त ५० चीच

Ajit Pawar on CM Face : पुढचा मुख्यमंत्री कुणाचा हे ठरलंय, अजितदादा स्पष्टच बोलले, चेहरा ठरवणं ही आमची…
छगन भुजबळ हे मुंबईतील अंजिरवाडीतील गणेशोत्सवात सहभागी झाले होते. बाप्पाच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी हे विधान केले. महायुतीच्या सर्व नेत्यांना बुद्धी द्यावी, हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल असे वक्तव्य नेत्यांनी करू नये. आपल्यात भेदभाव आहे, असे चित्र लोकांसमोर आणू नका. आपण सगळे एक आहोत, आणि एक होऊन विधानसभेला सामोरे जाणार आहोत, असेही ते म्हणाले.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

lalbaugcha rajamaharashtra assembly election 2024vidhan sabha nivadnuk 2024अमित शाह मुंबई दौराभाजप बैठकभाजप मिशन १२५
Comments (0)
Add Comment