५० हजार लाडक्या बहिणींवर अपात्रतेचा शिक्का, तुमचाही अर्ज बाद? आता पुढे काय होणार?

Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna रिजेक्ट झालेल्या अर्जदारांना पुढे पैसे मिळणार का नाही? असा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अनेक महिलांसाठी ‘लाडकी’ ठरत आहे. महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होत आहेत. आता महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसेही जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशातच आता तब्बल ५० हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रिजेक्ट झालेल्या अर्जदारांना पुढे पैसे मिळणार का नाही? असा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

अर्ज बाद, पुढे काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना लाभ मिळाला आहे. तब्बल ४ हजार ७८७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील जवळपास ५० हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु अर्ज बाद झालेल्या महिलांनी चिंता करण्याची गरज नाही. कारण सप्टेंबर महिन्यात त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या महिलांनी एक सप्टेंबरनंतर अर्ज केले आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकूण तीन हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.

Ladki Bahin Yojna : ५० हजार लाडक्या बहिणींवर अपात्रतेचा शिक्का, तुमचाही अर्ज बाद? आता पुढे काय होणार?

कुणाला मिळणार लाभ?

ज्या महिन्यात महिला अर्ज नोंदणी करेल, त्या महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. ४० ते ४२ लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे ते लिंक करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर उर्वरित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या १.६० कोटी लाभार्थी, ४७८७००००००० रुपयांचे वाटप, कॅबिनेट बैठकीत १५ मोठे निर्णय
ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अर्ज करता येणार आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ज्या महिलांनी एक सप्टेंबरआधी अर्ज केला नाही , त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा प्रत्येकी दीड हजारांचा निधी म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार नाहीत.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

ajit pawarhow to apply for Ladki Bahinmukhyamantri majhi ladki bahin yojnaअदिती तटकरेमहाराष्ट्र सरकार योजनामाझी लाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म
Comments (0)
Add Comment