Weekly Lucky Zodiac Sign 16 to 22 September 2024 : मालव्य राजयोग! सिंहसह ५ राशींना लागणार लॉटरी, कमाईच्या भरपूर संधी, वाचा साप्ताहिक लकी राशीभविष्य

Weekly Lucky Zodiacs 16 to 22 September Horoscope : ग्रहांच्या संयोगाने सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात मालव्य राजयोगाने होत आहे. या आठवड्यात शुक्र तुळ राशीत संक्रमण करेल. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र स्व:राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग तयार होतो. जाणून घ्या सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील लकी राशींबद्दल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Lucky Zodiac Sign 16 to 22 September 2024 : मालव्य राजयोग! सिंहसह ५ राशींना लागणार लॉटरी, कमाईच्या भरपूर संधी, वाचा साप्ताहिक लकी राशीभविष्य
Saptahik Lucky Zodiacs In Marathi :

ग्रहांच्या संयोगाने सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात मालव्य राजयोगाने होत आहे. या आठवड्यात शुक्र तुळ राशीत संक्रमण करेल. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र स्व:राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग तयार होतो.

मालव्य राजयोगामुळे मेषसह ५ राशींना फायदा होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात भरपूर कमाईच्या संधी मिळतील. हा आठवडा या राशीच्या लोकांना श्रीमंत बनवू शकतो. जाणून घेऊया मालव्य राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

मेष – नोकरीच्या संधी

मेष राशीला सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात करिअर, व्यवसायात चांगला लाभ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. या आठवड्यात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मिळालेल्या संधीच सोन करा, अन्यथा खूप वाट पाहावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यावसायिकांना अपेक्षित संधीची वाट पाहावी लागेल.

सिंह – समस्यांवर उपाय मिळेल

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणार असेल. या आठवड्यात नशीबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. बुद्धीने काम केल्यावर मोठे यश मिळविण्यात यशस्वी व्हाल. दीर्घकाळ सुरु असलेल्या समस्यांवर उपाय मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी लागेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

तुळ – नशिबाची साथ मिळेल

तुळ राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्याच्या या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल. या काळात तुमच्यात एक वेगळा उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल. त्यामुळे सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. राजकारणात असणाऱ्या लोकांना मोठे पद मिळेल. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल राहिल. जोडीदारासोबत धार्मिक ठिकाणी जाल.

धनु – गुंतवणुकीतून फायदा

सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल. या आठवड्यात गुंतवणुकीतून चांगला नफा होईल. गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय चांगली आहे. तुम्हाला उद्धटपणा टाळावा लागणार आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. लव्ह लाईफ चांगले राहिल. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

कुंभ – आर्थिक स्थिती सुधारेल

कुंभ राशीसाठी हा आठवडा चांगला असेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत धार्मिक ठिकाणी जाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

weekly lucky rashi september 2024weekly september horoscope in marathiआठवड्याचे भविष्यआठवड्याचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सआठवड्याच्या लकी राशीकुंडली विषयी बातम्याकोणत्या राशी लकी ठरतीलमालव्य राजयोगराशी भविष्यलकी राशी भविष्यसाप्ताहिक राशिफल मराठीसाप्ताहिक लकी राशी
Comments (0)
Add Comment