Narendra Modi Horoscope by Date of Birth: आज 17 सप्टेंबर 2024 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 17 सप्टेंबर 1950 रोजी दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्म कुंडलीवरून येणाऱ्या वर्षात ते कोणत्या आव्हानांचा सामना करतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन उभारी कशी देतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. यासंदर्भात ज्योतिषशास्त्री सचिन मल्होत्रा काय सांगतात ते जाणून घेवूया.
Narendra Modi Birthday Astrological Prediction:
ज्योतीषशास्त्रानुसार पंतप्रधान मोदी यांच्यावर शनिदेवाचा विशेष प्रभाव आहे. ज्या व्यक्तींवर शनिदेवाचा विशेष प्रभाव असतो, त्या व्यक्ती जीवनात खूप मोठं कार्य करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वृश्चिक लग्नाच्या जन्म कुंडलीकडे पाहिले असता, सध्या मंगळाच्या महादशेत बुधाच्या विंशोत्तरी दशेमुळे ते आर्थिक धोरणाबाबत मोठ्या मानसिक द्वंद्वात अडकलेले दिसत आहेत. तेव्हा येणारे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कसे असेल ते जाणून घेवूया.
पुढील वर्षी मार्च ते जून वादविवादाची शक्यता
यावर्षी झालेल्या निवडुणकीत भाजपा स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे आता केंद्रात सत्ता चालविण्यासाठी नितीशकुमार यांची जनता दल (युनायटेड), चंद्राबाबू नायडू यांची तेलुगु देसम पार्टी आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला. मात्र वक्फ बोर्ड कायदा सुधारणा, समान नागरी संहिता, जातीनिहाय जनगणना, अनुसूचित जातीच्या आरक्षणावर रोहिणी आयोगाने सुचविलेले प्रस्ताव यांसारख्या राष्ट्रीय मुद्द्यांवर नरेंद्र मोदींना त्यांच्या सहयोगी पक्षांसोबत विवादांचा सामना करावा लागतो आहे.
या संदर्भात पंतप्रधान मोदी यांची वर्ष कुंडली पाहिली असता, मंगळाच्या महादशेत बुधाची अंतर्दशा जून 2024 ते जून 2025 पर्यंत चालणार आहे. बुध त्यांच्या कुंडलीत पाप ग्रह केतूसोबत युती करत सूर्याच्या सान्निध्यात आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च ते जून पर्यंत काळ थोडा तणाव देणारा आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वभाव जलद निर्णय घेण्याचा आहे, पण त्यांना पाठिंबा देणारेच कार्यात विघ्न उत्पन्न करणारे असे दिसते आहे.
संकटाचे संकेत! मात्र नरेंद्र मोदी करतील संकटांवर मात
नरेंद्र मोदी यांची वर्ष कुंडली वृश्चिक लग्नाची आहे, जी त्यांच्याच जन्म लग्नासारखी आहे. ते अनुराधा नक्षत्र आणि वृश्चिक राशीचे जातक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वृश्चिक लग्नाच्या वर्ष कुंडलीत लग्नेश मंगळ हे अष्टम भावात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वर्ष कुंडलीत काही विवादास्पद वक्तव्यांमुळे सहयोगी पक्ष नाराज होतील असे योग दिसत आहेत. दरम्यान पुढील वर्षी जेव्हा नरेंद्र मोदी 75 वर्षे पूर्ण करतील, तेव्हा त्यांच्या वरील जबाबदारी आणि कार्यप्रणाली यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तथापि, वर्ष कुंडलीत दशम भावात बुध आणि एकादश भावात सूर्य-शुक्र यांच्या मजबूत स्थितीमुळे, नरेंद्र मोदी या सर्व अडचणींवर मात करतील. तसेच नवीन आर्थिक धोरण तयार करून वाढलेल्या बेरोजगारीचा दर काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न नक्की करतील. ज्यामुळे देशाला आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकेल.