Numerology Prediction, 23 September 2024 : सोमवार, 23 सप्टेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूल राहील. मुलांशी संबंधीत समस्या तुम्हालाल त्रास देणार आहेत.मूलांक 2 असणाऱ्यांचा अनावश्यक खर्च होणार आहे. मूलांक 3 चे लोक दिवसभर व्यस्त राहणार आहेत. मूलांक 4 च्या लोकांना ताणतणाव जाणवणार आहे. मूलांक 7 च्या जातकांनी अपशब्द बोलू नये. मूलांक 9 च्या लोकांसाठी दिवस ठिक असून प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे फक्त तब्येत सांभाळा. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – वादविवादापासून दूर राहा
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूल राहील. मुलांशी संबंधीत समस्या तुम्हालाल त्रास देणार आहेत. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याशी वादविवाद होतील, त्यामुळे चिंता वाढेल. डोकेदुखीमुळे त्रस्त राहाल. दिवसभर अनावश्यक खर्च गुंतवून ठेवतील. तुमच्या कामावर फोकस ठेवा तर ते पटापट मार्गी लागेल.
मूलांक 2 – अनावश्यक खर्च होणार
मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. आज तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आर्थिक संकटे घिरट्या घालतील. कुटुंबात मतभेद वाढणार आहे तेव्हा काळजी घ्या. आज कोणालाही पैसे उधार देऊ नयेत, हे पैसे वसूल करणे कठीण होईल. हृदयात एक प्रकारची अस्वस्थता राहील. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. मित्रांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल.
मूलांक 3 – दिवसभर व्यस्त राहणार
मूलांक 3 असणारे जातकांना आजचा दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मन आनंदीत होईल. आज काही अनावश्यक आळस राहील. पायाशी संबंधित काही आजार होऊ शकतात. पैशांची गुंतवणुकीत तुमचा रस वाढेल. धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घ्याल. कामात जास्तच व्यस्त राहणार आहात.
मूलांक 4 – नातेसंबंधात कटूता आल्याने ताणतणाव
मूलांक 4 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. नातेसंबंध सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न कराल पण त्यात यश मिळणार नाही. अनावश्यक मानसिक ताण राहील. सासरच्या नातेवाईकांसोबत वाद घालू नका. कर्मचाऱ्यांसोबत स्नेहपूर्वक बोला. आज विश्वासघात होण्याची शक्यता दिसते.
मूलांक 5 – घरासंदर्भातील समस्या दूर होणार
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक असून घरासंदर्भातील समस्या दूर होणार आहेत. जोडीदाराचा सल्ला अवश्य ऐका. व्यवसायात काम भरपूर आहे फक्त नियोजन महत्त्वाचे आहे. थोडा आळस वाटणार आहे पण त्याला दूर करा आणि कामाला लागा. कौटुंबिक संबंध सामान्य राहतील. तुम्ही भूतकाळात घेतलेला निर्णय आज त्रासदायक ठरेल.
मूलांक 6 – धार्मिक कार्यात आवड वाढणार
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमचे कोणासोबत मतभेद असतील तर ते दूर होणार आहेत. आज धार्मिक कार्यात रूची घेणार आहात. जोडीदाराला भेटवस्तू दिल्याने लाभ होईल. आज कोणाशीही वाद घालू नका, कारण अखेरीस तुम्हीच चुकीचे ठरला.
मूलांक 7 – अपशब्द बोलू नका
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही तुमचा बाजू स्पष्ट करण्याचा अधिक प्रयत्न कराल तिथे तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. आज तुम्ही काहीजणांना अपशब्द बोलाल, ते योग्य असणार नाही. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात वेळ चांगली आहे पण कामात फोकस महत्त्वाचा आहे.
मूलांक 8 – सहकारी कामात मदत करतील
मूलांक 8 साठी दिवस चांगला आहे. तुम्ही अध्यात्माकडे ओढले जाणार आहात. ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे. ऑफिसचे सहकारी प्रत्येक कामात मदत करतील. एखादी गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, कागदपत्रांचे वाचन नीट करा. घरातील वातावरण आनंदी असेल.
मूलांक 9 – प्रोजेक्ट पूर्ण होणार, तब्येत सांभाळा
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही परदेशातील एखादे प्रोजेक्ट हाती घेतले असेल तर ते पूर्ण होईल. तब्येतीची खास काळजी घ्या जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर अस्वस्थ वाटणार आहे. व्यवसायात नवे काम येणार आहे त्या संदर्भात गुंतवणूक करताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या.