should we keep ancestors photo at home temple : असे म्हटले जाते की, पूर्वज हे देवाच्या बरोबरीचे असतात परंतु, त्यांना देव मानता येत नाही. पितृपक्षाच्या काळात त्यांची मनोभावे विधी आणि पूजा केल्याने आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्यासाठी काहीजण आपल्या पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवतात असे करणे वास्तुशास्त्रानुसार किती योग्य आहे हे जाणून घेऊया.
Pitru Paksha 2024
वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरात अशा अनेक वस्तू ठेवतो ज्याचा आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सहन करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा, घरातील कोपरे, किचन, बेडरुम, हॉलरुम आणि देवघर हे अतिशय महत्त्वाचे मानण्यात आले आहे.
सध्या पितृपक्षाचा कालावधी सुरु आहे. १८ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवडा सुरु होईल. २ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असून पितरांचे श्राद्ध केले जाणार आहे. यावेळी मृत व्यक्तीचे स्मरण केले जाते आणि पूजेदरम्यान त्यांचे फोटो ठेवले जातात. या काळात आपण पूर्वाजांच्या आत्माच्या शांतीसाठी धार्मिक विधी करतो. तसेच तर्पण विधी, पिंडदान विधी देखील केली जाते. श्राद्ध करण्याचे देखील अनेक नियम आहेत.
असे म्हटले जाते की, पूर्वज हे देवाच्या बरोबरीचे असतात परंतु, त्यांना देव मानता येत नाही. पितृपक्षाच्या काळात त्यांची मनोभावे विधी आणि पूजा केल्याने आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्यासाठी काहीजण आपल्या पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवतात असे करणे वास्तुशास्त्रानुसार किती योग्य आहे हे जाणून घेऊया.
देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवावेत का?
- वास्तुशास्त्रानुसार देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नये. यामुळे देवी-देवतांचा कोप होतो. तसेच आपल्यावर अनेक संकटे देखील येतात.
- शास्त्रानुसार पितरांचे स्थान देवी-देवतांपेक्षा खालच्या स्तराचे मानले गेले आहे. त्यामुळे देवासोबत पूर्वजांचे फोटो लावू नका.
- मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने वास्तुदोष तयार होतो तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
- देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने कामात अनेक अडथळे येतात. तसेच आर्थिक चणचण कायम राहाते.
- देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात संकटे येऊ लागतात. तसेच ग्रह कमजोर होतात.
- वास्तुशास्त्रानुसार घरातील जिवंत लोकांसोबत पितरांचे फोटो कधीही लावू नका. जीवनातील संकटे वाढतात, आरोग्यावर परिणाम होतो.
पूर्वजांचे फोटो कुठे ठेवायला हवे?
- घराच्या मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यासाठी पितरांचे फोटो ठेवण्याची जागा नेहमी वेगळी असायला हवी. तुम्ही त्यांचा फोटो घराच्या भिंतीवर लावू शकता. पितृपक्षाच्या काळात काही गोष्टींचे आणि नियमांचे पालन केले तर पितृदोषसारख्या अनेक गोष्टींतून तुमची सुटका होईल.
- वास्तूशास्त्रानुसार पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो घरात लावू नये. घराच्या मुख्य दरवाजात पूर्वजांचे फोटो नसायला हवेत. तसेच बेडरुम आणि हॉलरुममध्ये चुकूनही पूर्वजांचे फोटो लावू नका. पूर्वजांचे फोटो हे नेहमी घरातून बाहेर पडताना दिसतील अशा ठिकाणी लावायला हवे.