आजचे अंकभविष्य, 27 सप्टेंबर 2024: आळस झटका, कामाला लागा ! हट्टीपणा सोडा, लाभ होईल ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 27 September 2024 : शुक्रवार, 27 सप्टेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही जी काही कामे हाती घेतलेली आहेत किंवा विचार केलेला आहे ती पूर्ण होणार आहेत.मूलांक 2 चा दिवस तणावात्मक आणि तब्येतीची काळजी घ्या. मूलांक 4 ने हट्ट सोडावा तर लाभ होतील.मूलांक 5 असणाऱ्या लोकांच्या नियोजनात थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. तर मूलांक 7 च्या मान, सन्मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. मूलांक 9 ने रागावर नियंत्रण गरजेचे आहे. रणनीती फेल ठरण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 27 सप्टेंबर 2024: आळस झटका, कामाला लागा ! हट्टीपणा सोडा, लाभ होईल ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ank bhavishya, 27 September 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक १ साठी दिवस चांगला तर मूलांक २ ते ९ यांच्यासाठी दिवस फारसा चांगला नाही. गुंतवणूकिचा विचार पुढे ढकला कारण आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रणनीती फेल झाल्यामुळे तुमच्या रागाचा पारा चढू शकतो. तुमची किंवा कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते.आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – हाती घेतलेली कामे पूर्ण होणार

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही जी काही कामे हाती घेतलेली आहेत किंवा विचार केलेला आहे ती पूर्ण होणार आहेत. वडिलांच्या तब्येतीची काळजी कारण अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या हटवादीपणा करून कोणताही निर्णय घेवू नका त्याचे विपरीत परिणाम होतील. तुमच्या तब्येतीची खास काळजी घ्या. दिवसभरात अनावश्यक खर्चात गुंतून राहण्याची शक्यता आहे.

मूलांक 2 – दिवस तणावात्मक, तब्येतीची काळजी घ्या

मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस तणावात्मक असेल. आज गुंतवणुकिचा विचार करत असाल तर निर्णय पुढे ढकला. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या, जर काही तपासण्या सांगितल्या तर त्वरीत करून घ्या. तुम्हाला जर रक्तदाबाचा त्रास असेल तर काळजी घ्या. कोणालाही पैसे उधार देऊ नयेत, हे पैसे वसूल करणे कठीण होईल. आर्थिक संकटे घिरट्या घालणार आहेत.

मूलांक 3 – ताणतणाव वाढण्याची शक्यता, आळस झटका

मूलांक 3 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमचा ताणतणाव वाढणार आहे आणि कामात लक्ष लागणार नाही. तुम्हाला श्वसनासंदर्भात काही आजार असेल तर विशेष काळजी घ्या कारण तो आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज काही अनावश्यक आळस राहील, तो कमी करण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 4 – हट्ट सोडा, तर लाभ होणार

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही आज खूप काही कार्य करण्याचा प्रयत्न कराल पण प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक पद्धतीने करावी. मी हे करणार, मी ते करणार असे फक्त म्हणू नये. खूप दिवसांपासून थांबलेले तुमचे कार्य आज पूर्ण होणार आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि कोणालाही अपशब्द बोलू नका. अनावश्यक हट्ट सोडला पाहिजे, तरच जीवनात काही लाभ होईल हे लक्षात ठेवा.

मूलांक 5 – नियोजनात थोडी गडबड होण्याची शक्यता

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही जो काही विचार केला आहे आणि परिस्थीती यात तफावत आढळेल. तुमच्या नियोजनात थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन संधी येते आहे पण विचार करून आणि कागदपत्रे तपासून पुढे पाऊल टाकावे. आज मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. पैशांच्या बाबतीत दिवस ठीक आहे, गुंतवणूक करु शकता.

मूलांक 6 – तब्येतीकडे लक्ष द्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुम्हाला एखाद्या गोष्टी ऍलर्जी असेल तर त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आणि तब्येत ठिक असेल तरच आपण सगळं काही करु शकतो. प्रेमप्रकरणापासून दूर राहणे चांगले आहे अन्यथा मानसिक त्रास होवू शकतो, तसेच घरात ताण तणाव वाढेल. आज कोणाशीही वाद घालू नका.

मूलांक 7 – मान, सन्मानाला धक्का लागण्याची शक्यता

मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, तुमची तब्येत बिघडू शकते. दिवसभर डोकेदुखीमुळे त्रस्त राहणार आहात. तुमच्या मुलांचे कारभार तुमचा ताण वाढविणार आहेत. दिवसभर प्रत्येक कामात अडथळे येतील. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याशी वादविवाद होतील, त्यामुळे चिंता वाढेल. तुमच्या मान, सन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का लागण्याची शक्यता आहे.

मूलांक 8 – दिवस त्रासदायक, कामात समस्यांचा डोंगर

मूलांक 8 साठी दिवस त्रासदायक आहे. तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे ठरणार असून आज प्रत्येक कामात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आज काही महत्त्वाचे काम होतील असे तुम्हाला वाटेल पण तसं काहीही होणार नाही. कोणालाही उधार देवू नका, ते पैसे परत मिळणार नाहीत. वाहन सांभाळू चालवा, अपघाताची शक्यता आहे. आज तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आर्थिक संकटे वाढण्याची शक्यता आहे.

मूलांक 9 – रागावर नियंत्रण महत्त्वाचे

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरी, ऑफिसमध्ये जी वीजेवर चालणारी यंत्रणा आहे त्याची विशेष काळजी घ्या. तुम्ही जो काही विचार केला आहे किंवा तुमची रणनीती फेल ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या रागाचा पारा वाढेल. पण तुमचा राग वाढला तर तब्येत बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा काळजी घ्या.एखादी गुंतवणूक धोकादायक ठरू शकते. कुटुंबात एखादा वादा निर्माण होईल, ज्याचा तुम्हाला त्रास होईल. आज तुम्हाला काही गोष्टी टाळाव्या लागतील.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

27 सप्टेंबर 2024 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 27 September 2024Numerology 27 September 2024 horoscopeNumerology Horoscope In Marathi 27 SeptemberToday's Numerology 27 September prediction September in marathitodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याघरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?राशी भविष्य
Comments (0)
Add Comment