‘नवरा माझा नवसाचा २’ने किती कमावला गल्ला? कोट्यवधींची कमाई लाखोंवर घसरली

Navra Maaza Navsaacha 2 Box Office Collection: ‘नवरा माझा नवसाचा २’ हा सिनेमा २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने आतापर्यंत किती कमाई केली, घ्या जाणून.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: प्रेक्षकांना भूरळ घालणारा ‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा २००५ साली रीलिज झाला होता आणि आता २०२४ साली या सिनेमाचा सीक्वेल म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रदर्शित झाला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच या सिनेमाने १ कोटीहून अधिक कमाई केली, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही २ कोटी आणि ३ कोटींहून अधिक कमाई झाली. मात्र त्यानंतर ‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईमध्ये घट पाहायला मिळाली. पहिल्या आठवड्यात या सिनेमा १४ कोटींपेक्षा जास्त ग्रॉस कलेक्शन झाले आहे. सिनेमाच्या टीमकडूनही याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

Sacnilk च्या वृत्तानुसार, २० सप्टेंबर रोजी सिनेमा रीलिज झाला त्यादिवशी १.८५ कोटी कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी २.५ कोटी आणि ३.७५ कोटी कमाई केली. यानंतर चौथ्या दिवसापासून कमाई घटली. चौथ्या दिवशी १.२ कोटी, पाचव्या दिवशी १.१ कोटी, सहाव्या दिशी ९५ लाख आणि सातव्या दिवशी ९ लाखाची कमाई झाली. एकूण ७ दिवसात भारतातील नेट कलेक्शन १२.२५ कोटी झाले आहे, तर ग्रॉस कलेक्शन १४.५० कोटी झाले आहे.

दरम्यान सिनेमाच्या टीमने शेअर केलेल्या पोस्टनुसार सिनेमाची ग्रॉस कमाई १४.३६ कोटी झाली आहे. सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशीनेही ही पोस्ट शेअर केली आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’साठी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी सिनेमाचे कौतुक केले आहे, तर काहींनी पहिल्या सिनेमाशी तुलना करत हा सिनेमा आवडला नसल्याचेही म्हटले आहे. असे असले तरी बहुतांश ठिकाणी सिनेमागृहांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’साठी गर्दी पाहायला मिळते आहे.

राखी सावंत आली हो! बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एन्ट्री, निक्कीच्या चेहऱ्यावर वाजले बारा
दरम्यान सिनेमाच्या कास्टबद्दल बोलायचे झाल्यास, दुसऱ्या भागात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरिश दुधाणे यांसारखे कलाकारसुद्धा आहेत.

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड…. आणखी वाचा

Source link

navra maza navsacha 2 box office collectionnavra maza navsacha 2 box office collection day 7navra maza navsacha 2 storysachin pilgaonkar latest movieअशोक सराफनवरा माझा नवसाचा सीक्वेलनवरा माझा नवसाचा २नवरा माझा नवसाचा २ कास्टसिद्धार्थ जाधवस्वप्नील जोशी
Comments (0)
Add Comment