आजचे राशिभविष्य, २९ सप्टेंबर २०२४ : वृषभसह ३ राशींचे मालमत्तेतील वाद सुटतील! मन उदास राहिल, वाचा रविवारचे राशीभविष्य

Rashi Bhavishya 29 September 2024 Today Horoscope in Marathi : आज २९ सप्टेंबर शनिवार असून द्वादशी तिथी आहे. मघा नक्षत्र असून साध्य योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. वृषभ, तुळसह काही राशीचे मालमत्तेचा वाद संपेल. घरातील महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत घ्याल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, २९ सप्टेंबर २०२४ : वृषभसह ३ राशींचे मालमत्तेतील वाद सुटतील! मन उदास राहिल, वाचा रविवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 29 September 2024 :
आज २९ सप्टेंबर शनिवार असून द्वादशी तिथी आहे. मघा नक्षत्र असून साध्य योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. वृषभ, तुळसह काही राशीचे मालमत्तेचा वाद संपेल. घरातील महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत घ्याल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. वाहनाशी संबंधित समस्या पुन्हा उद्भवतील. मालमत्तेबाबत सुरु असलेला वाद वरिष्ठांच्या मदतीने सोडवला जाईल. सासरच्या बाजूने गोष्टीत सुधारणा होईल. आर्थिकदृष्ट्या ताण जाणवेल. दिवसाच्या सुरुवातीपासून कामात व्यस्त राहाल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. बचत कमी कराल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – व्यवसायात नफा

आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुमच्या रखडलेल्या कामांना आज गती मिळेल. तुमच्या नफ्याचा मार्ग मोकळा होईल. वैवाहिक नात्यात तुम्हाला प्रेम आणि विश्वासाचा अनुभव येईल. घरातील महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत घ्याल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. वाहनाशी संबंधित समस्या पुन्हा उद्भवतील.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ वाचा

वृषभ – मालमत्तेतील वाद सुटतील

आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील समस्या त्रास देतील. काम करणाऱ्यांना भविष्याची चिंता सतावेल. मालमत्तेबाबत सुरु असलेला वाद वरिष्ठांच्या मदतीने सोडवला जाईल. सासरच्या बाजूने गोष्टीत सुधारणा होईल. आर्थिकदृष्ट्या ताण जाणवेल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

मिथुन – मन उदास असेल

आज पैशांचे उत्पन्न निश्चित असेल. भविष्यासाठी सौदे फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीबाबत चिंतेत असाल. मन थोडेसे उदास वाटेल. व्यवसायामुळे कुटुंबाला वेळ देता येणार नाही. आई तुमच्यावर नाराजी व्यक्त करु शकते. दिवसाच्या सुरुवातीपासून कामात व्यस्त राहाल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. बचत कमी कराल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना वस्त्र दान करा

कर्क – कामात कठोर परिश्रम करा

आज तुम्हाला व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील तरच अडचणीतून सुटाल. कामात उत्साह दाखवला तर पूर्ण होईल. वडिलांच्या मार्गदर्शनाने कौटुंबिक व्यवसायात फायदा होईल. घरातील ज्येष्ठांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा

सिंह – वाद संयमाने सोडवाल

आज व्यवसायात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. घेतलेल्या निर्णयाला विरोध केला जाईल. कुटुंबातील काही वाद संयमाने सोडवण्यात यशस्वी व्हाल. मतभेदामुळे नात्यात नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रेम जीवन आनंदी राहील.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा

कन्या – रखडलेली कामे पूर्ण

आज काही ठिकाणी तुमचा मान – सन्मान कमी होईल. तुमच्या मनात निराशेची भावना राहिल. कमी आर्थिक उत्पन्नामुळे गरजेनुसार पैसे मिळतील. कुटुंबातील सदस्यांचा मागण्या पूर्ण करण्यात वेळ जाईल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. धार्मिक कार्यात सक्रीयपणे सहभागी व्हाल. शारीरिक समस्या त्रास देतील.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा.

तुळ – आळस सोडा

आज कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल. तुम्हाला आळस सोडावा लागेल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित अनेक अनुभव मिळतील. तुमची अनेक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. घरातील अपूर्ण कामे आज पूर्ण करावी लागतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मुलाच्या लग्नातील अडथळे भावाच्या मदतीने दूर होतील.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला

वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा

आज तुमच्या वागण्यात थोडा हट्टीपणा असेल, ज्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा मांडण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही संबंध बिघडू शकतात. बाहेरच्या कामातून फायदा होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

धनु – घरात वाद होतील

आज नवीन वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांशी संवाद साधू शकता. तुम्हाला प्रवास शक्यतो टाळावा लागेल. तुमची आवडती वस्तू हरवू शकते. आरोग्य चांगले राहिल. कामाच्या ठिकाणी मजबूत राहाल. शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. तणावामुळे घरात वाद होतील.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला तांब्यांच्या लोट्यातून जल अर्पण करा

मकर – व्यवसायात यश मिळेल

आजच्या दिवशी तुमचे विचार इतरांशी जुळू शकतात. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. लाइफ पार्टनरशाठी भेटवस्तू खरेदी कराल. कुटुंबातील सदस्याच्या मदतीने वाद सुटतील. कार्यक्षेत्रात गुंतागुंतीची कामे पूर्ण होतील.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

कुंभ – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांसोबत बाहेर जावे लागेल. तुमचे पैसे अधिक खर्च होतील. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणतेही अपूर्ण काम करावेसे वाटणार नाही. वडिलांची तब्येत बिघडू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या.

मीन – पैसे खर्च होतील.

आज तुम्हाला घरासाठी काही पैसे खर्च करावे लागतील. तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा समतोल राखावा लागेल. बिझनेसमध्ये नवीन योजना सुरु कराल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडचणी संपतील. कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. लव्ह लाईफबद्दल तुमचा आदर वाढेल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

आजची लकी राशीआजचे राशी भविष्य २९ सप्टेंबरदैनिक राशी भविष्य२९ सप्टेंबर राशिभविष्य२९ सप्टेंबर राशीचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment