Weekly Horoscope 30 September to 6 october 2024 : ऑक्टोबर महिन्याच्या या आठवड्यात अनेक शुभ संयोग जुळून येत आहे. बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच सर्वपित्री अमावस्या असून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे वृषभ, मिथुनसह काही राशींनी सावध राहावे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
ऑक्टोबर महिन्याच्या या आठवड्यात अनेक शुभ संयोग जुळून येत आहे. बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच सर्वपित्री अमावस्या असून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे वृषभ, मिथुनसह काही राशींनी सावध राहावे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. महिलांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. घर आणि ऑफिसमध्ये संतुलन राखा. हिंतचिंताकांच्या सल्ल्याने कामे पूर्ण होतील. व्यवसायातील प्रवास लाभाचा ठरेल. नोकरदार लोकांसाठी काळ अनुकूल राहिल. शरीर आणि मन दोन्हीकडे लक्ष देणारा आहे. आरोग्याशी संबंधित समस्या येतील. मालमत्तेतील वाद बाहेर सोडवा. नोकरदार लोकांची बदली होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या मार्गाने पाऊल उचलणे टाळा. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
मेष – वाद होतील
या आठवड्याची सुरुवात कामातील समस्यांनी होईल. कुटुंबात वाद होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीला महत्त्व देणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. महिलांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. घर आणि ऑफिसमध्ये संतुलन राखा. हिंतचिंताकांच्या सल्ल्याने कामे पूर्ण होतील. व्यवसायातील प्रवास लाभाचा ठरेल. नोकरदार लोकांसाठी काळ अनुकूल राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात तीव्रता राहिल. जोडीदारासोबत विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. कुटुंबाशी संबंधित निर्णय घेताना वडिलांचे सहकार्य लाभेल.
भाग्यशाली रंग : गुलाबी
भाग्यशाली अंक : 11
वृषभ – आरोग्याची काळजी घ्या
वृषभ राशीसाठी हा आठवडा शरीर आणि मन दोन्हीकडे लक्ष देणारा आहे. आरोग्याशी संबंधित समस्या येतील. मालमत्तेतील वाद बाहेर सोडवा. नोकरदार लोकांची बदली होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या मार्गाने पाऊल उचलणे टाळा. नोकरीच्या ठिकाणी मतभेद होतील. वैयक्तिक संबंधांमध्ये पूर्णपणे प्रामाणिक राहा. जोडीदाराची फसवणूक करु नका. त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
भाग्यशाली रंग : तपकिरी
भाग्यशाली अंक : 8
मिथुन – पैसे खर्च होतील
हा आठवडा आरोग्य आणि नातेसंबंध दोघांकडे लक्ष देणारा असावा. कामाचा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार पडेल. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवासादरम्यान सामानाची विशेष काळजी घ्या. पैसे खर्च होतील. सरकारी कामे रखडतील. जवळच्या मित्राची मदत होईल. महत्त्वाच्या कामात प्रगती होईल. तुम्हाला आनंद आणि समाधान वाटेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. लव्ह पार्टनर तुमच्या सोबत असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करु नका. पोटाचा त्रास होईल.
भाग्यशाली रंग : जांभळा
भाग्यशाली अंक : 1
कर्क – व्यवसायात प्रगती
हा आठवडा तुमच्यासाठी सुखाचा, समृद्धीचा आणि यशाचा असेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. व्यवसाय विस्तार करण्यासाठी योजना बनवाल. सरकारशी संबंधित योजनांचा लाभ घ्याल. मार्केटिंग करणाऱ्यांना हा आठवडा लाभाचा असेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध दृढ होतील.
भाग्यशाली रंग : राखाडी
भाग्यशाली अंक : 10
सिंह – अडकलेले पैसे मिळतील
सिंह राशीच्या लोकांना कामाबद्दल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. राजकारणातील लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळेल. नेतृत्वगुण विकसित होतील. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. तुमचा उत्साह वाढेल. अडकलेले पैसे मिळतील. व्यवसाय वाढण्याची संधी मिळेल. प्रेम व्यक्त करण्याची इच्छा पूर्ण होईल. इच्छुकांचे लग्न जमेल.
भाग्यशाली रंग : केशरी
भाग्यशाली अंक : 7
कन्या – फसवणूक होण्याची शक्यता
हा आठवडा आरोग्य आणि कामात सावध राहाण्याचा आहे. नोकरी करत असाल किंवा व्यवसायात कुणावरही विश्वास ठेवू नका. पैशांच्या समस्या उद्भवतील. व्यावसायिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. कोणताही कागद नीट वाचूनच सही करा. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनी नीट विचार करून आपले काम योग्य दिशेने पुढे नेले पाहिजे, अन्यथा लाभाऐवजी नुकसान होऊ शकते. तुमची फसवणूक होऊ शकते. वैयक्तिक नात्यातील गैरसमज सोडवाल. प्रेमात सावधगिरीने पाऊल टाकाल. भावनेच्या भरात मोठा निर्णय घेऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
भाग्यशाली रंग : सोनेरी
भाग्यशाली अंक : 2
तुळ – रखडलेली कामे पूर्ण होतील
या आठवड्यात रखडलेली कामे पूर्ण होतील. पदोन्नती किंवा इच्छित ठिकणी बदलीची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा शुभ आणि यशाचा असेल. मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. प्रेमसंबंधाचे रुपातंर लग्नात होईल. नातेवाईक तुमच्या लग्नाला संमती मिळेल.
भाग्यशाली रंग : पांढरा
भाग्यशाली अंक : 9
वृश्चिक – वागण्यावर नियंत्रण ठेवा
वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. रागात कोणाला चुकीचे बोलू नका. वादग्रस्त गोष्टींपासून लांब राहा. कामाच्या ठिकाणी वाद टाळण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींना महत्त्व देणे टाळा. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात तोटा टाळावा लागेल. काम आणि अनावश्यक धावपळीचा परिणाम आरोग्यावर होईल. शारीरिक थकवा जाणवेल. प्रेमसंबंधात विचारपूर्वक निर्णय घ्यावी. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.
भाग्यशाली रंग : काळा
भाग्यशाली अंक : 5
धनु – पदोन्नती होईल
या आठवड्यात कामाचा ताण जास्त राहिल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळेल. तुम्हाला अतिरिक्त मेहनत करावी लागेल. इच्छित ठिकाणी पदोन्नती होईल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याबाबत मन थोडेसे चिंतेत राहिल. रखडलेल्य कामांना योग्य दिशा मिळेल. तुमचे मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहिल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घ्या. करिअर आणि व्यवसायातील प्रयत्न यशस्वी होतील. प्रेमसंबंधामधील विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल.
भाग्यशाली रंग : नीळा
भाग्यशाली अंक : 8
मकर – व्यवसायात चढ-उतार
या आठवड्यात महत्त्वाचे काम करण टाळा. तुम्हाला अपमान किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. कुणीतरी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. रागात मोठे निर्णय घेणे टाळा. तुम्हाला पराभव स्विकारावा लागेल. नोकरदार लोकांची बदली होईल. पदोन्नती आणि पगारवाढ अपेक्षित होणार नाही. व्यवसायात चढ-उतार होतील. कामावर लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक समस्या संवादाने सोडवा. नात्याबद्दल प्रामाणिक राहाल. प्रेम प्रकरणांमध्ये एक पाऊल पुढे टाका
भाग्यशाली रंग : पिवळा
भाग्यशाली अंक : 14
कुंभ – कामातील अडथळे वाढतील
हा आठवडा कामाच्या योजना इतरांसमोर उघडपणे करणे टाळा. विरोधक यात अडथळे निर्माण करतील. कामातील अडथळे चिंतेचे कारण ठरतील. हितचिंतकांचा मदतीने प्रश्न मिटतील. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद उद्भवतील. कुटुंबात प्रेम, शांती राहिल. तुमच्या समस्या पालकांकडून सुटतील. नोकरदार लोकांची बदली झाल्यामुळे धावपळ वाढेल. प्रेमसंबंधात सावध राहा. सामाजिक अपमान सहन करावा लागेल. जोडीदाराची साथ मिळेल.
भाग्यशाली रंग : लाल
भाग्यशाली अंक : 3
मीन – व्यवसायात अपेक्षित नफा
आनदांची बातमी मिळाल्याने घरातील वातावर चांगले असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मालमत्तेली वाद न्यायलयाबाहेर सुटल्याने सुटकेचा निश्वास टाकाल. नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचा सन्मान वाढेल. तुमच्या उत्साहात आणि शौर्यात वाढ होईल. काम वेळेवर पूर्ण कराल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
भाग्यशाली रंग : हिरवा
भाग्यशाली अंक : 12