Vastu Money Tips : आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात नवदुर्गेच्या नऊ रुपांची विधीवत पूजा केली जाते. नवदुर्गेची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते, अशी पौराणिक मान्यता आहे. तसेच व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून सुटका होते. नवरात्रीत धनप्राप्तीचे काही उपाय केल्याने लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहिल.
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा हा उत्सव ३ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. या काळात नवदुर्गेच्या नऊ रुपांची विधीवत पूजा केली जाते.
नवदुर्गेची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते, अशी पौराणिक मान्यता आहे. तसेच व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून सुटका होते. नवरात्रीत धनप्राप्तीचे काही उपाय केल्याने लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहिल.
दिवा लावा
नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहिरीजवळ किंवा नदीजवळ दिवा लावा. त्यानंतर लक्ष्मी देवीचे स्मरण करा.
वडाच्या पारंब्या
नवरात्रीमध्ये लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर वडाच्या पारंब्या घरी आणा आणि त्या तिजोरीत ठेवा. तिजोरी बंद करण्यापूर्वी देवी लक्ष्मी आणि नवदुर्गा यांचे नाव घ्या. तुमची सर्व संकटांपासून सुटका होईल तसेच पैसे मिळतील.
श्री सूक्ताचे पठण
नवरात्रीत नऊ दिवसांत सकाळी लवकर उठून लक्ष्मी आणि श्री सूक्ताचे ११ वेळा पठण करा. असे १०८ दिवस सतत केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहाते.
खीर अर्पण करा
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी देवीला खीरीचा नैवेद्य अर्पण करा. तसेच ९ वेळा कनकधारा स्त्रोताचा पाठ करा. यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर राहिल. जीवनात पैशाची कमतरता येणार नाही.
पिंपळाचे झाड
जर घरात सतत आर्थिक चणचण भासत असेल तर नवरात्रीत लाल कापड आणि देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. तसेच आर्थिक समस्या दूर होतात.
कमळ
नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय शुभ मानले गेले आहे. परंतु, नवरात्रीत शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहिल.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.