Today horoscope 7 october 2024 somvar navratri day fifth daily astrology rashi bhavishya in marathi dhanu meen zodiac lucky daily prediction

Rashi Bhavishya 7 october 2024 Today Horoscope in Marathi : आज ७ ऑक्टोबर सोमवार असून नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे पंचमी तिथीला अनेक शुभ संयोग जुळून आले आहे. मकर, कुंभसह काही राशींना आर्थिक चणचण भासेल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. धनलाभ झाल्याने आनंदी असाल. गुंतवणूक केल्याने फायदा होईल. कुटुंबातील समस्यांपासून आराम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ७ ऑक्टोबर २०२४ : धनुसह या राशींनी पैसे गुंतवणे टाळा! रागावर आवर घाला, वाचा सोमवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 7 october 2024 :
आज ७ ऑक्टोबर सोमवार असून नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे पंचमी तिथीला अनेक शुभ संयोग जुळून आले आहे. मकर, कुंभसह काही राशींना आर्थिक चणचण भासेल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. धनलाभ झाल्याने आनंदी असाल. गुंतवणूक केल्याने फायदा होईल. कुटुंबातील समस्यांपासून आराम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. पैसे खर्च होतील. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळेल. एखाद्याला दिलेले वचन पूर्ण कराल. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करु शकाल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळेल. एखाद्याला दिलेले वचन पूर्ण कराल. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करु शकाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – यश मिळेल

विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबात शुभ घटना घडतील. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास कराल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. धनलाभ झाल्याने आनंदी असाल. गुंतवणूक केल्याने फायदा होईल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा

वृषभ – पैसे खर्च होतील

आज तुम्ही कठोर परिश्रमातून लाभाची अपेक्षा करु नका. मेहनत केल्यानंतर काही काळाने फळ मिळेल. तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. कुटुंबातील समस्यांपासून आराम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. पैसे खर्च होतील.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.

मिथुन – वचन पूर्ण कराल

आज कुटुंबातील सदस्य आपल्या मुद्द्यावर ठाम असेल. तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळेल. एखाद्याला दिलेले वचन पूर्ण कराल. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करु शकाल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा

कर्क – वाद होतील

आजचा दिवस संमिश्र असेल. तुम्हाला व्यवसायात फायदा होईल परंतु, निराश होऊ नका. नोकरीत तुम्हाला प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम पूर्ण करावे लागेल. अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतात. घरातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पालकांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाड्डू अर्पण करा

सिंह – गुंतवणूक करा

नवीन कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. गुंतवणुकीची संधी मिळाली तर सोडू नका, भविष्यात मोठा फायदा होईल. कामात मग्न असाल. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल तरच यश मिळेल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

कन्या – थकवा जाणवेल.

आज सरकारी वाद सोडवण्यासाठी घाई करावी लागेल. तुम्हाला कठोर परिश्रम केल्यावर यश मिळेल. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कोणाशीही वाद घालू नका. भविष्यातील योजनांवर चर्चा कराल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णु देवाचे पूजन करा

तुळ – मानसिक शांती मिळेल.

कौटुंबिक वाद आज मिटतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कामाची गती थोडी मंद असेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे कमवाल. तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ करा

वृश्चिक- आर्थिक नफा होईल.

आज तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. मेहनतीनुसार फळ मिळणार नाही. आर्थिक नफ्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल. विवाहातील अडथळे दूर होतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने आहे. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

धनु – पैसे गुंतवणे टाळा

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुरु असलेले वाद सोडवावे लागतील. तुमच्या व्यवसायात नवीन गोष्टी सुरु कराल, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहिल. पैसे गुंतवणे टाळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमची काही प्रभावशाली लोकांशी भेट होईल.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा

मकर – यश मिळेल

आज कोणताही निर्णय घेताना मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे मन एकाग्र करु निर्णय घ्या तरच यश मिळेल. एखाद्याच्या मदतीसाठी पुढे जाल. शत्रूंपासून सावध राहावे. नुकसान होण्याची समस्या आहे.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा.

कुंभ – खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा

आज व्यवसायातील अडथळे तुमचे मन अस्वस्थ करतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. तुम्हाला काही विशेष माहिती मिळेल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न वस्त्र दान करा

मीन – चिडचिड होईल.

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमचे जुने काम पूर्ण होईल. कोणताही व्यवसाय कराल त्यात यश मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज चिडचिड होऊ शकते. कौटुंबिक सदस्यांशी वाद होईल. बोलण्यात गोडवा ठेवा.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर अर्पण करा

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Aajche Rashi Bhavishya 7 octoberdaily rashi bhavishya 7 octoberHoroscope Today 7 october In marathimaharashtra times rashi bhavishya todaytoday rashi bhavishya 7 octobertodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याराशी भविष्यराशी विषयी बातम्यासोमवारचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment