आजचे अंकभविष्य, 7 ऑक्टोबर 2024: खर्चात वाढ, तब्येतीची काळजी घ्या! ताणतणाव कमी करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 7 October 2024 : सोमवार, 7 ऑक्टोबर आज ललीता पंचमी असून दुर्गामातेच्या स्कंदमाता रूपाचे पूजन केले जाते. मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात निष्काळजीपणा करु नका. मूलांक 2 असणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. मूलांक 3 च्या खर्चात वाढ तर मूलांक 4 च्या जातकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मूलांक 6 साठी नवीन प्रोजेक्ट येणार तर मूलांक 8 च्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. मूलांक 9 च्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 7 ऑक्टोबर 2024: खर्चात वाढ, तब्येतीची काळजी घ्या! ताणतणाव कमी करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ank bhavishya, 7 October 2024: सोमवार, 7 ऑक्टोबर नवरात्रीचा पाचवा दिवस असून त्याला ललीता पंचमी असे म्हणतात. आज स्कंदमातेचे पूजन केले जाते. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक ५ आणि मूलांक ६ साठी दिवस चांगला आहे. धनलाभाची शक्यता असून सर्व कामे मार्गी लागणार आहेत. मूलांक १ सह या मूलाकांनी खास काळजी घ्यायला हवी. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – कामात निष्काळजीपणा नको

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात निष्काळजीपणा करु नका. कामामध्ये फोकस महत्त्वाचा आहे. आज जुन्या मित्रांच्या भेटी होणार आहेत. तुम्हाला एखादी नवीन सुरुवात करायची असेल तर दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत दिवस सुखद व्यतित कराल. तुम्हाला आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मूलांक 2 – तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता

मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्याबद्दल शोक करण्यात काही उपयोग नाही. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आज दिवस फार चांगला राहील. आई-वडिलांचा आशिर्वाद तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देणार आहे.

मूलांक 3 – खर्चात वाढ होणार

मूलांक 3 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. तुम्ही स्वतःबद्दल जरा जास्तच विचार करणार आहात. खर्च वाढणार आहे, तुम्ही काही वस्तू खरेदी करणार आहात. नवीन ओळखी होतील त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील

मूलांक 4 – तब्येतीची काळजी घ्या

मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमची जास्त धावपळ झाल्यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आज तुम्हाला जवळची व्यक्ती मदत करणार आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला व्यतीत होईल.

मूलांक 5 – व्यवहारिक दृष्टिकोनातून शुभलाभ

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांच्यावर फारसा विश्वास ठेवू नका. ते तुमच्यासाठी योग्य नाही. व्यवहारिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी शुभलाभाचा योग आहे. एखाद्या गरजवंताला शक्य झाले तर मदत करा. आज व्यापार विस्ताराबद्दल सखोल विचार करू शकता, पण तज्ज्ञाचा सल्लाही घ्या.

मूलांक 6 – नवीन प्रोजेक्ट येणार, प्रवासाचा योग

मूलांक 6 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला कामात नवीन संधी येणार आहेत. तसेच प्रवासाचे योग आहेत, त्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्याकडे नवीन प्रोजेक्ट येणार आहे. आज तुम्ही कोणतीही गोष्ट करताना त्यावर संयम ठेवा आणि सौम्य भाषेचा वापर करा. कौटुंबिक बाबतीत आज दिवस ठीक राहील.

मूलांक 7 – प्रवासात लाभ, कामे मार्गी लागतील

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे. कामानिमित्त तुमचा प्रवास होणार आहे, तसेच प्रवासात तुम्हाला लाभ होईल आणि तुमची कामे मार्गी लागतील. जमीन किंवा मालमत्ता यासंदर्भात काही व्यवहार करायचे असतली तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. व्यापार विस्तारासाठी तुम्ही नवे मार्ग शोधाल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल.

मूलांक 8 – रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 8 साठी दिवस ठिक आहे. तुम्ही स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. समोरची व्यक्ती काय बोलते आहे त्यांचे पण ऐकून घ्या. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. पैशांच्या बाबतीत दिवस ठिक आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसाय विस्ताराचा विचार करु शकता. कुटुंबासाठी दिवस चांगला आहे.

मूलांक 9 – खर्च वाढण्याची शक्यता.

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही घराच्या बांधकामाबद्दल विचार करत असाल तर दिवस चांगला आहे, पण यामुळे तुमचा खर्च वाढणार आहे. तुम्ही कोणत्याही वादविवादात पडू नका. व्यापार विस्तारासाठी तुम्ही नवे मार्ग शोधाल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

7 ऑक्टोबर 2024 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 7 October 2024Numerology 7 October 2024 horoscopeNumerology Horoscope In Marathi 7 OctoberToday's Numerology 7 October prediction October in marathitodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याघरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?राशी भविष्य
Comments (0)
Add Comment