Budh Gochar 2024 : महाष्टमीला लक्ष्मीनारायण योग! तुळसह ५ राशी ठरतील लकी, नोकरीच्या नव्या संधी, कामात भरभराटी

Laxmi Narayan Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार १० ऑक्टोबरला बुध तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु, शुक्र पूर्वीपासून तुळ राशीत असल्यामुळे या दोन्ही ग्रहांचा संयोग तयार होईल. त्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. यादिवशी दुर्गा देवीची आठवी माळ असल्यामुळे महागौरीचे पूजन केले जाणार आहे, तसेच महाअष्टमीचे व्रतही पाळले जाईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणावापासून आराम मिळेल. जाणून घेऊया लकी राशीबद्दल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Budh Gochar 2024 : महाष्टमीला लक्ष्मीनारायण योग! तुळसह ५ राशी ठरतील लकी, नोकरीच्या नव्या संधी, कामात भरभराटी
Budh Gochar In Tula Rashi :
ज्योतिषशास्त्रानुसार १० ऑक्टोबरला बुध तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु, शुक्र पूर्वीपासून तुळ राशीत असल्यामुळे या दोन्ही ग्रहांचा संयोग तयार होईल. त्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. यादिवशी दुर्गा देवीची आठवी माळ असल्यामुळे महागौरीचे पूजन केले जाणार आहे, तसेच महाअष्टमीचे व्रतही पाळले जाईल.
ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी लक्ष्मीनारायण योगामुळे मेष, तुळसह ६ राशींना फायदा होईल. तसेच दुर्गा देवीचा आशीर्वाद देखील त्यांच्यावर राहाणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणावापासून आराम मिळेल. जाणून घेऊया लकी राशीबद्दल

लक्ष्मी नारायण योगाचा मेष राशीवर प्रभाव

मेष राशीच्या लोकांना महाअष्टमीच्या दिवशी शुभ फले मिळतील. या काळात मित्र आणि प्रियजनांसोबत आवडत्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. कामात तुम्ही खूप आनंदी आणि समाधानी असाल. व्यावसायिक जीवनातील अडचणी संपुष्टात येतील. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. या राशीच्या लोकांना परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. संपत्तीत चांगली वाढ होईल.

लक्ष्मी नारायण योगाचा मिथुन राशीवर प्रभाव

मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक लाभात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. दीर्घकाळापासून रखडलेल्या कामाना गती मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली भेटवस्तू मिळेल. नोकरीत असलेले लोक कौशल्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर पगारवाढ घेतील. या काळात विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल.

लक्ष्मी नारायण योगाचा सिंह राशीवर प्रभाव

सिंह राशीच्या लोकांसाठी उत्पन्न वाढीचे नवीन स्त्रोत प्रदान होतील. भविष्य घडवण्यावर तुमचे लक्ष केंद्रित असेल. या काळात तुमच्या करिअर, कौटुंबिक आणि नातेसंबंधातून लाभ होतील. नशिबाने पैशांच्या संबंधित समस्या दूर होतील. चांगले पैसे कमवाताना बचत देखील करा.

लक्ष्मी नारायण योगाचा कन्या राशीवर प्रभाव

कन्या राशीच्या लोकांच्या अनेक मनोकामना पूर्ण होताना दिसतील. तुमचे आरोग्य चांगले राहिल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. नोकरीत असलेल्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. नशिबाने साथ दिल्यास व्यवसाय करणारे देखील स्पर्धेत जिंकतील. वैवाहिक जीवन चांगले राहिल.

लक्ष्मी नारायण योगाचा तुळ राशीवर प्रभाव

तुळ राशीच्या लोकांच्या या काळात बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. स्वत:चा व्यवसाय करत असाल तर नफा होईल. तुम्ही कामात वर्चस्व प्रस्थापित करु शकाल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप सुधारणा होतील. त्यामुळे सर्वजण तुमच्यावर प्रभावित होतील. तुमच्याकडून सल्ला घेतला जाईल. तुमचे आरोग्य चांगले राहिल.

लक्ष्मी नारायण योगाचा कुंभ राशीवर प्रभाव

कुंभ राशीचे लोक या काळात कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतील. कोणत्याही कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकले असाल तर त्यातून सुटाल. काम यशस्वी झाल्याने आनंदी असाल. नोकरदार लोकांना उत्तम संधी मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहिल. समाजात तुमचा मान- सन्मान वाढेल.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

बुधाचे संक्रमण कुणासाठी लाभदायकबुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीवर परिणाममहाष्टमीला लक्ष्मीनारायण योगलक्ष्मीनारायण योग
Comments (0)
Add Comment