गुरुवार १० ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १८ आश्विन शके १९४६, आश्विन शुक्ल सप्तमी दुपारी १२-३१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा उत्तररात्री ५-४० पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: हस्त दुपारी २-०५ पर्यंत
सप्तमी तिथी दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. अतिगंड योग दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, वणीज करण दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३३
- सूर्यास्त: सायं. ६-१८
- चंद्रोदय: दुपारी १२-५७
- चंद्रास्त: रात्री ११-५७
- पूर्ण भरती: पहाटे ४-१३ पाण्याची उंची ३.५० मीटर, दुपारी ३-३५ पाण्याची उंची २.९९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-०५ पाण्याची उंची २.४७ मीटर, रात्री ९-५९ पाण्याची उंची १.५४ मीटर
- सण आणि व्रत: महालक्ष्मी पूजन, सरस्वती पूजन, सूर्याचा चित्रा नक्षत्र प्रवेश, वाहन म्हैस
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४० मिनिटांपासून ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४ मिनिटांपासून ते २ वाजून ५० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४३ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून ते ७ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटांपासून ते १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ५० मिनिटांपासून ते ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ मध्यरात्री १२ वाजून ३१ मिनिटांपासून ते १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
दुर्गा मातेची विधीवत पूजा करून त्यांना मालपुआ आणि खिरीचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)