आजचे राशिभविष्य, ११ ऑक्टोबर २०२४ : महानवमी! मीनसह या राशींना अचानक धनलाभ, कामात यश मिळेल, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Rashi Bhavishya 11 october 2024 Today Horoscope in Marathi : आज ११ ऑक्टोबर शुक्रवार असून महानवमी आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. घरातील आणि बाहेरचे लोक स्वार्थीपणाने वागतील. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ११ ऑक्टोबर २०२४ : महानवमी! मीनसह या राशींना अचानक धनलाभ, कामात यश मिळेल, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 11 october 2024 :
आज ११ ऑक्टोबर शुक्रवार असून महानवमी आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. घरातील आणि बाहेरचे लोक स्वार्थीपणाने वागतील. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. वागण्यात आणि बोलण्यात संयम ठेवा, नात्यात तेढ निर्माण होईल. कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होईल. आई-वडिलांना तीर्थक्षेत्राला घेऊन जाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – यश मिळेल

आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा असेल. तुम्ही मेहनत केली तर व्यवसाय आणि नोकरीत यश मिळेल. कुटुंबातील सर्वांचा इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा अतिरिक्त खर्च वाढेल. तब्येतील चढ-उतार होतील. घरातील कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढा. स्वभावात आळसपणा वाढेल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

वृषभ – घाईगडबड करु नका

आजचा दिवस चांगला असेल. नोकरीमध्ये घाईगडबडीत कोणतेही काम करु नका. पदोन्नतीत अडथळे येतील. घरातील आणि बाहेरचे लोक स्वार्थीपणाने वागतील. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा कराल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ करा

मिथुन – वाद होतील

आज तुम्ही नोकरी व्यवसायातून जास्त अपेक्षा कराल, ज्यातून निराशा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ढासळेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. वागण्यात आणि बोलण्यात संयम ठेवा, नात्यात तेढ निर्माण होईल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा

कर्क – नुकसान होईल.

आज नोकरदार लोक आपल्या अधिकाऱ्यांच्या वागण्याने नाराज होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. व्यवसायात पार्टनरशीपमध्ये नुकसान होऊ शकते. निराश होऊन चुकीचे पाऊल उचलू नका. आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

सिंह – पैसे खर्च होतील

आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहिल. कोणत्याही कामात निष्काळजीपणा असेल तर नुकसान होईल. आज व्यवसायात तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नफा कमी होऊ शकतो. जास्तीच्या व्यवसायामुळे धावपळ करावी लागेल. जवळची व्यक्ती कुटुंबास भेट देईल. पैसे खर्च होतील.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीशिव चालीसाचे पठण करा

कन्या – नशिबाची साथ मिळेल.

आज तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस शुभ राहिल. भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमची सर्जनशील विचार पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत शुभ कार्यक्रमात वेळ घालवाल. व्यवसायात नवीन योजना सुरु करण्यासाठी दिवस चांगला जाईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

तुळ – कुटुंबात अशांतता असेल

आज तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाची साथ मिळेल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस समाधानकारक असेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. घरातील सुखसोयींवर काही पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होईल. आई-वडिलांना तीर्थक्षेत्राला घेऊन जाल.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

वृश्चिक – नुकसान होईल

आज तुम्ही मनोरंजनाकडे अधिक आकर्षित असाल. व्यवसायात काही महत्त्वाची कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न कराल. परंतु, त्यामुळे नुकसान होईल. भविष्यातील काही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला मोठ्यांचे बोलणे ऐकावे लागेल.
आज भाग्य ६८ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

धनु – मन अस्वस्थ राहिल.

आज मोठे लोक व्यावसायिक समस्या ऐकून मदत करतील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. तुमचे पैसेही खर्च होतील. मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकायला मिळतील. तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. व्यवसायाच्या संदर्भात सहलीला जावे लागेल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

मकर – इतरांचे बोलणे ऐकून घ्या

आज व्यवसायात तुमचे काही निर्णय चुकतील. तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळा. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. इतरांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्या
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्री गणेश चालीसाचे पठण करा

कुंभ – प्रगतीच्या संधी मिळतील

आज तुम्हाला छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. विनाकारण वाद होऊ शकतात. राजकारणातील संबंधित लोकांना प्रगतीच्या संधी मिळतील. कोर्ट किंवा सरकारी कामात अडथळे येतील. सामाजिक कार्यात सक्रीयपणे सहभागी व्हाल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढर चंदन कपाळावर लावा.

मीन – धनलाभ होईल

आज व्यवसायात कोणतेही काम वेळेवर होणार नाही. अचानक धनलाभ होईल. घरातील सुखसोयी वाढवण्याचा विचार कराल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी चर्चा कराल. स्वभावाचा इतरांवर प्रभाव पडेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य करावे लागेल. आरोग्यामध्ये शारीरिक कमजोरी जाणवू शकते.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Aajche Rashi Bhavishya 11 octoberdaily rashi bhavishya 11 octoberHoroscope Today 11 october In marathimaharashtra times rashi bhavishya todaytoday rashi bhavishya 11 octobertodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याराशी भविष्यराशी विषयी बातम्याशुक्रवारचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment