आजचे राशिभविष्य, १३ ऑक्टोबर २०२४ : सिंहसह ३ राशींना जुन्या कर्मचाऱ्यांकडून लाभ! आर्थिक चणचण संपेल, वाचा रविवारचे राशीभविष्य

Rashi Bhavishya 13 october 2024 Today Horoscope in Marathi : आज १३ ऑक्टोबर रविवार असून पापंकुशा एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्याने आपल्या इच्छित फलप्राप्ती होते. गुरू आणि शुक्र एकमेकांच्या सातव्या घरात असल्यामुळे समसप्तक योग तयार होत आहे. षष्ठ योग आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. सिंह, तूळ, धनु राशीसह इतर 5 राशींना लाभदायक ठरणार आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, १३ ऑक्टोबर २०२४ : सिंहसह ३ राशींना जुन्या कर्मचाऱ्यांकडून लाभ! आर्थिक चणचण संपेल, वाचा रविवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 13 october 2024 :
आज १३ ऑक्टोबर रविवार असून पापंकुशा एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्याने आपल्या इच्छित फलप्राप्ती होते. गुरू आणि शुक्र एकमेकांच्या सातव्या घरात असल्यामुळे समसप्तक योग तयार होत आहे. षष्ठ योग आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. सिंह, तूळ, धनु राशीसह इतर 5 राशींना लाभदायक ठरणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद होईल. तुमचे खर्च वाढतील. नोकरीसाठी काम करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल. आज तुमच्या सुखसोयी वाढवण्यासाठी पैसे खर्च कराल. तुम्हाला याचा फायदा होईल. पार्टनरशिप मध्ये व्यवसाय केला तर चांगला नफा होईल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – खर्च वाढतील

आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवासाला जावे लागेल. ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे उद्दिष्ट पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणतेही काम काळजीपूर्वक करा. कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद होईल. तुमचे खर्च वाढतील. नोकरीसाठी काम करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या सोबत असेल. गायत्री मंत्राचे पठण करा

वृषभ – व्यवसायात नफा होईल.

आज तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. मालमत्ते गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस चांगला असेल. घरात आणि नोकरीत तुमच्या इच्छेनुसार काम कराल. आज तुमच्या सुखसोयी वाढवण्यासाठी पैसे खर्च कराल. तुम्हाला याचा फायदा होईल. पार्टनरशिप मध्ये व्यवसाय केला तर चांगला नफा होईल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा

मिथुन – योजना यशस्वी होतील

आज तुमच्या काही नवीन योजना यशस्वी होतील. एखादी गोष्ट शिकण्याची संधी मिळू शकते. तुमचे मन प्रसन्न राहिल. मुलांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुम्हाला जुन्या कर्जातून सुटका मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक मेहनत करावी लागेल. तरच यश मिळेल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची आराधना करा

कर्क – शुभ कार्यात पैसे खर्च होतील

आज तुमचे पैसे काही शुभ कार्यात खर्च होतील. ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. तुमच्या नोकरीत सहकाऱ्यांशी तुमचा वाद संपेल. धार्मिक कार्यक्रमात वेळ घालवाल. सासरच्या कोणाशी वाद झाला तर जोडीदार पाठीशी उभा राहिल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णुसहस्त्र नामाचे पठण करा.

सिंह – जुन्या सहकाऱ्यांकडून फायदा

आज तुम्हाला जुन्या सहकाऱ्यांकडून फायदा होईल. व्यवसायात कोणताही निर्णय शहाणपणाने आणि विवेकाने घेतल्यास यश मिळेल. तुम्ही शुभ समारंभात सहभागी व्हाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. काही पैसे खर्च होतील. लव्ह लाईफमध्ये भरभराटी येईल. प्रियकराची तुमच्या कुटुंबाशी ओळख करुन द्याल. मित्राच्या मदतीने पुढे याल.
आज भाग्य ९९ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

कन्या – कामात यश मिळेल

आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अडचणी येतील. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. मेहनतीने काम केल्यास तुम्हाला यश मिळेल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा

तुळ – रखडलेले पैसे मिळतील

आज तुमच्याकडून कामात चुका होतील. नोकरीत तुमचे सहकारी तुमच्या कामात मदत करतील. पैसे मिळाल्याने संपत्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. घरात काही शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. रखडलेले पैसे आज मिळतील.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. आई-वडीलांचा आशीर्वाद घ्या

वृश्चिक – प्रवास करताना काळजी घ्या

आज तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. लांबचा प्रवास करताना काळजी घ्या. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. भावाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबातील वरिष्ठांशी चर्चा कराल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तु दान करा

धनु – मन विचलित होईल

आज तुमचे मन विचलित होऊ शकते. अपूर्ण काम पूर्ण कराल. पूजा कार्यात तुमची रुची वाढेल. व्यवसायात काही नवीन योजना बनवाल. ज्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल. भावंडांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत सुरु असलेले वाद संपतील.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

मकर- निराशा येईल

आज तुम्हाला व्यवसायात कोणताही करार फायनल करायचा असेल तर इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. कोणताही निर्णय घेताना मनाचा विचार करा. भविष्यात निराशेला सामोरे जावे लागेल. आज तुम्हाला कोणाला तरी पैसे उधार द्यावे लागतील. कुटुंबातील वाद आज मिटतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा

कुंभ – खर्च वाढेल

आज तुम्ही बांधकामाच्या कामात व्यस्त असाल, ज्यामध्ये तुमचा खर्च वाढेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा

मीन- व्यवसायातून नफा

आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. तुमचा संपूर्ण दिवस आनंदात राहिल. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. आज धार्मिक कार्यात अधिक रुची राहिल. तुमचे पैसे खर्च होतील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायत गुंतवणूक केल्यास नफा मिळेल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना पीठाचे गोळे खाऊ घाला.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Aajche Rashi Bhavishya 13 octoberdaily rashi bhavishya 13 octoberHoroscope Today 13 october In marathimaharashtra times rashi bhavishya todaytoday rashi bhavishya 13 octobertodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्यारविवारचे राशीभविष्यराशी भविष्यराशी विषयी बातम्या
Comments (0)
Add Comment