Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. सूर्य तुळ राशीत प्रवेश करत असल्यामुळे आणि बुध आधीच उपस्थित असल्यामुळे हा राजयोग तयार होईल. मेष, वृषभ, तुळसह काही राशींना फायदा होईल. आठवड्याच्या शेवट तुमच्या सर्व चिंता दूर होतील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. सूर्य तुळ राशीत प्रवेश करत असल्यामुळे आणि बुध आधीच उपस्थित असल्यामुळे हा राजयोग तयार होईल. मेष, वृषभ, तुळसह काही राशींना फायदा होईल. आठवड्याच्या शेवट तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कामात चांगला परिणाम मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदाराचा सहवास कठीण काळात दिलासा देईल. वैवाहिक जीवन मधुर राहिल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. योगा आणि ध्यान करा. आर्थिक बाबीसोबत मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्या राशींना या राशींचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर
मेष – पैशांच्या समस्या दूर होतील
हा आठवडा मेष राशीच्या लोकांचा सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. संयम आणि शहाणपणाने समस्यांवर उपाय शोधाल. स्त्री मित्राच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात पैशाशी संबंधित चिंता दूर होतील. मोठ्या प्रकल्पासाठी तुमची निवड होईल. आठवड्याच्या शेवट तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कामात चांगला परिणाम मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदाराचा सहवास कठीण काळात दिलासा देईल. वैवाहिक जीवन मधुर राहिल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. योगा आणि ध्यान करा
भाग्यशाली रंग: जांभळा
भाग्यशाली अंक: 10
वृषभ – रोजगाराच्या संधी मिळतील
वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आळस जाणवेल. यश तुमच्यापासून दूर जाऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरदार लोकांवर हा आठवडा कामाचा बोजा राहिल. कोर्टातील निकाल लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात अनावश्यक गोष्टींवर जास्त पैसे खर्च होतील. आर्थिक बाबीसोबत मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.
भाग्यशाली रंग: तपकिरी
भाग्यशाली अंक: 8
मिथुन – मित्रांचे सहकार्य मिळेल
रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील. वरिष्ठांच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणातील समस्या दूर होतील. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवास सुखकर आणि लाभदायक होईल. या काळात तुम्हाला तुमच्या हितचिंतक मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुने आजार उद्भवू शकतात. वैवाहिक जीवन मधुर होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
भाग्यशाली रंग: सोनेरी
भाग्यशाली अंक: 11
कर्क – वरिष्ठांचा सल्ला घ्या
कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही काम नियोजनाशिवाय करु नये, अन्यथा निराशा येईल. कामाच्या ठिकाणी पूर्ण समर्पणाने काम करा. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. भावनेने कोणताही निर्णय घेणे टाळा. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. कुटुंब तुमचे प्रेम स्विकारेल. वैवाहिक जीवनात गोड वाद सुरु राहतील. जोडीदाराचे आरोग्य चिंतेचे कारण बनेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांच्या भविष्याबाबत मानसिक दबाव राहील.
भाग्यशाली रंग: केशरी
भाग्यशाली अंक: 15
सिंह – सावध राहा
आरोग्य आणि नातेसंबंधात कोणाचीही उपेक्षा करु नका. दोघांचा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडेल. जुने आजार पुन्हा उद्भवतील. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. तुम्हाला विवेकबुद्धीने काम करावे लागेल. नोकरदार लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात काही समस्या येतील. तुम्ही काही समस्यांवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. या काळात अचानक लांबचा प्रवास घडू शकतो. प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या. स्त्रिया त्यांचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात घालवतील. प्रेमसंबंधात सावधपणे पाऊले उचला. घाईत केलेल्या गोष्टी खराब होतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
भाग्यशाली रंग: जांभळा
भाग्यशाली अंक: 9
कन्या – निराशा सहन करावी लागेल
आठवड्याच्या सुरुवातीला थोडी निराशा सहन करावी लागेल. तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे फार गरजेचे आहे. योजना पूर्ण न झाल्याने दु:खी व्हाल. अपयश मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मिळेल. या काळात तुमच्या कामाला गती मिळेलच पण समाजात तुमची प्रतिमा मजबूत राहिल. न्यायालये, बँकिंग क्षेत्र आणि सल्लागारांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला राहिल. प्रेमसंबंध घट्ट होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
भाग्यशाली रंग: गुलाबी
भाग्यशाली अंक: 3
तुळ – पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
तुळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपले मनोबल खचू देऊ नये. कोणाचीही दिशाभूल करु नका. तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा तरच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. शेअर बाजारात पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. काही विशेष कामात घाई करु नका. तरुणांना या काळात यश मिळेल. वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंधात गोडवा राहिल.
भाग्यशाली रंग: हिरवा
भाग्यशाली अंक: 5
वृश्चिक – कामे पूर्ण होतील
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप मजेशीर असेल. तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल. मित्र आणि हितचिंतकांच्या सहकार्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याची संधी मिळेल. कमी अंतराचा प्रवास कराल. अचानक प्रिय व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. प्रेमसंबंधामध्ये तीव्रता राहिल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
भाग्यशाली रंग: लाल
भाग्यशाली अंक: 1
धनु – गैरसमज दूर होतील
धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात शुभ आणि लाभदायक ठरेल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. एखाद्या समस्येमुळे बिघडलेले संबंध पुन्हा नीट होतील. प्रेमसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज दूर होतील. प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती कराल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा. पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या
भाग्यशाली रंग: पिवळा
भाग्यशाली अंक: 4
मकर – कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होतील
मकर राशीचे लोक या आठवड्याच्या सुरुवातील आरोग्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल चिंतेत राहतील. कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्द्यावरुन वाद होतील. ध्येयापासून विचलित होऊ नका. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होतील. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहिल. विवेकबुद्धीने काम करा. व्यावसायिकांना व्यवहारात अडचणी येतील. कोणत्याही नवीन योजनेत हुशारीने गुंतवणूक करा. प्रेम संबंधांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. घाईने केलेले काम बिघडू शकते.
भाग्यशाली रंग: पांढरा
भाग्यशाली अंक: 7
कुंभ – कामात अडथळे येतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात कामातील अडथळ्यांनी होईल. तुम्हाला संयम ठेवून काम करावे लागेल. तुमची क्षमता आणि कलागुणांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न कराल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम राहिल. तुमची प्रतिष्ठा राखण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कंटाळा येईल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचा प्रयत्न कराल. कार्यालयात वरिष्ठांसोबत समन्वय ठेवा. प्रेमसंबंध दृढ होतील. मित्राच्या मदतीने तुमचे काम पूर्ण होईल. जोडीदारासोबत उभे राहिल्याने मनोबल वाढेल.
भाग्यशाली रंग: निळा
भाग्यशाली अंक: 12
मीन – रागावू नका.
मीन राशीच्या लोकांना या आठवड्याच्या आपल्यावर वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमची कामे बिघडतील. घरगुती वाद मिटवताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईक तुमच्या मताचे समर्थन करत नसतील. कोणत्याही प्रकारे रागावू नका. युक्तीवाद बरोबर असेल. कामाच्या ठिकाणी कोणताही निष्काळजीपणा प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहावे. या काळात कोणत्याही प्रकारची जोखमी घेणे टाळा. प्रेमसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.
भाग्यशाली रंग: काळा
भाग्यशाली अंक: 16