आजचे अंकभविष्य, १५ ऑक्टोबर २०२४: पैशांची गुंतवणूक करणे टाळा! व्यवसायात लाभ ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 15 October 2024 : मंगळवार, १५ ऑक्टोबर, मूलांक 1 असणाऱ्यांनी पैशांचा व्यवहार टाळावा. मूलांक 2 व्यवसायात आर्थिक नुकसान होणार आहेत. तसेच व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी काळजीपूर्वक विचार करा. मूलांक 5 जोडीदारासोबत आजचा दिवस आनंददायी जाईल. मूलांक 7 मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी असाल. मूलांक 8 असणाऱ्यांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल मूलांक 9 व्यवसायात तुम्हाला आज लाभ होईल. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, १५ ऑक्टोबर २०२४: पैशांची गुंतवणूक करणे टाळा! व्यवसायात लाभ ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ank bhavishya, 15 October 2024: मंगळवार, १५ ऑक्टोबर मूलांक ३ सह या मूलांकासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी काळजीपूर्वक विचार करा. प्रकृती खराब होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंददायी जाईल. पैशाची कमतरता जाणवणार नाही. मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान कराल. जोडीदाराशी प्रेमाने वागाल. मूलांक १ ते ९ या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – पैशांची समस्या संपेल

आजचा दिवस सामान्य राहिल. पैशांच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल असेल. पैशासंबंधीत तुमची चिंता आज संपेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास दिवस सामान्य राहिल. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी काळजीपूर्वक विचार करा. प्रकृती खराब होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंददायी जाईल.

मूलांक 2 – मानसिकदृष्ट्या आनंदी असाल

आज नशिब तुमच्या बाजूने असेल. पैशांच्याबाबतीत आजचा दिवस चांगला राहिल. गुंतवणुकीतून दुप्पट परिणाम मिळतील. पैशाची कमतरता जाणवणार नाही. मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान कराल. जोडीदाराशी प्रेमाने वागाल.

मूलांक 3 – मानसिक तणाव जाणवेल

तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुम्ही खूप मानसिक तणावाखाली असाल. पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम राहिल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहिल. पार्टनरशीपमध्ये नवीन प्रस्ताव येतील. आजचा दिवस कुटुंबासोबत अनुकूल आहे. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल.

मूलांक 4 – नशिबाची साथ मिळेल

आजचा दिवस पैशांच्या दृष्टीकोनातून चांगला असेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नशिब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात तुम्हाला आज लाभ होईल. व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचा विचार कराल. आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदी असेल.

मूलांक 5 – पैशांची चिंता सतावेल

आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला नसेल. पैशांच्या बाबतीत चिंता सतावेल. पैसा हुशारीने गुंतवा. व्यवसायात काही नवीन मार्ग खुले होतील. नोकरदारांनी आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहावे. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. इतरांवर रागवणे टाळा.

मूलांक 6 – विचारपूर्वक निर्णय घ्या

आजचा दिवस चांगला राहिल. अचानक पैसे मिळाल्याने खूश असाल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरीच्या बाबतीत तुम्हाला बुद्धीने आणि सकारात्मक विचाराने निर्णय घ्यावा लागेल. पगार वाढविण्याचा विचार करु शकता. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. कुटुंबातील सदस्यांसह घरातील मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करु शकता.

मूलांक 7 – व्यवसायात प्रगती

तुम्ही स्वभावाने खूप सर्जनशील असाल. अध्यात्मिक गोष्टींची आवड राहिल. पैशांच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायासाठी आजचा काळ अनुकूल राहिल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहिल.

मूलांक 8 – जोडीदारासोबत प्रेमाने वागाल

आज पैसे कुठेही गुंतवू नका. नोकरीच्या श्रेणीबद्दल आज नशिब तुमच्या बाजूने असेल. नोकरी बदलायची असेल तर तुम्ही आजच विचार करु शकता. कुटुंबासोबत आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक सदस्यांसह धार्मिक सहलीला जाण्याचा प्लान कराल. जोडीदारासोबत प्रेमाने वागाल.

मूलांक 9 – व्यवसायात बढती

आज तुम्ही खूप उत्साही असाल. पैशांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर खूप फायदा होईल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायासाठी काही नवीन मार्ग दिसतील, त्यामुळे आज तुम्ही आंतरिकरित्या खूप आनंदी असाल. नोकरदार लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या शहाणपणाची आणि हुशारीची खूप प्रशंसा केली जाईल, ज्यामुळे आज तुमचा पगार देखील थोडा वाढू शकतो. कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. आज तुमच्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहा आणि सौम्य भाषा वापरा.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

15 ऑक्टोबर 2024 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 15 October 2024Numerology 15 October 2024 horoscopeNumerology Horoscope In Marathi 15 OctoberToday's Numerology 15 October prediction October in marathitodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याघरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?राशी भविष्यव्यवसायात नफा होईल?
Comments (0)
Add Comment