yek number movie box office collection: महिन्याभरापासून चर्चेत असलेला हा येक नंबर चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.
पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. त्यात उत्सुकता वाढवली ती धमाकेदार ट्रेलरनं. चित्रपटाची भव्यता ट्रेलर, गाण्यांमधून दिसतच आहे. प्रेक्षकही या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. त्यात माऊथ पब्लिसिटीनं या चित्रपटाबाबत अधिकच कुतूहल निर्माण केले आहे. चित्रपटाचा पहिला भाग काहींना आवडत आहे तर काहींना पूर्वार्ध अधिक भावला आहे. अनेकांनी धैर्यच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. तर अनेकांना तेजस्विनी पंडितची धडाडीची व्यक्तिरेखा प्रचंड आवडली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांची विचारधारा सांगणारा आहे. अशा सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने या चित्रपटानं चांगलाच जोर धरल्याचं दिसत आहे.
माऊथ पब्लिसिटीनं केली कमाल; सुरुवात स्लो पण विकडेजमध्ये मात्र ‘येक नंबर’ चित्रपटानं धरला चांगलाच जोर
झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राज ठाकरे यांच्याशी खास कनेक्शन
दरम्यान, या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आल्यापासूनच सिनेमासंदर्भात वेगळीच चर्चा सुरू झाली होती. हा सिनेमा म्हणजे राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आपलं प्रेम मिळवण्यासाठी, गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळत आहे.