Vastushashtra Rules On Diwali : लवकरच दिवाळीचा सण सुरु होणार आहे. त्यापूर्वी आपण घराची योग्यप्रकारे सफासफाई करतो. बरेचदा साफसफाई करताना आपण अशा काही गोष्टी पुन्हा घरात ठेवतो ज्यामुळे आपल्या नकारात्मक ऊर्जा घरात सहज प्रवेश करते. दिवाळीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या वस्तू फेकून द्यायला हव्या जाणून घेऊया.
लवकरच दिवाळीचा सण सुरु होणार आहे. त्यापूर्वी आपण घराची योग्यप्रकारे सफासफाई करतो. बरेचदा साफसफाई करताना आपण अशा काही गोष्टी पुन्हा घरात ठेवतो ज्यामुळे आपल्या नकारात्मक ऊर्जा घरात सहज प्रवेश करते.
यंदा दिवाळी अर्थात लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबरला असणार आहे. हा सण साजरा करण्यामागे देखील धार्मिक कारण आहे. या दिवशी काही नियमांचे पालन केल्याने देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते. त्यामुळे व्यक्तीला कधीच पैशाची कमतरता भासत नाही. दिवाळीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या वस्तू फेकून द्यायला हव्या जाणून घेऊया.
तुटलेला आरसा
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दिवाळीपूर्वीच तुटलेला आरसा आणि घड्याळ घराबाहेर फेकून द्या.
तुटलेल्या मूर्तीचे विसर्जन
घरात किंवा मंदिरात कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती असेल तर दिवाळीपूर्वीच तिचे विसर्जन करा. वास्तुनुसार तुटलेली मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
गंजलेल्या वस्तू
गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की, यामुळे घरात नकारात्मक परिणाम होतात. तसेच घरामध्ये टेबल, खुर्चीसारखे न वापरणाऱ्या गोष्टी देखील फेकून द्याव्यात.
फाटलेले बूट किंवा चप्पल
बुटांच्या कपाटात फाटलेले बूट किंवा चप्पल असेल तर दिवाळीपूर्वीच घराबाहेर फेकून द्या. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात सतत भांडण होतात. आर्थिक चणचण भासते आणि नकारात्मक ऊर्जा जाणवते.