दिवाळी २०२२ : ‘असे’ करावे लक्ष्मी गणेश पूजन; पाहा, योग्य पद्धत व नियम

Diwali Laxmi Puja : दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाची योग्य पद्धत व पूजनाचे काही नियम जाणून घेऊया…

हायलाइट्स:

  • लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी
  • लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
  • लक्ष्मीपूजनाचा विधी
  • लक्ष्मीपूजनावेळी पाळावयाचे काही नियम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे. यंदा शुक्रवारी, १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाची योग्य पद्धत व पूजनाचे काही नियम जाणून घेऊया…

लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी

दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे.

लक्ष्मीपूजनाचा विधी

लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचा घट घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.

लक्ष्मीपूजनावेळी पाळावयाचे काही नियम

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्य स्तोत्रांचे पठण करावे. लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी. लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय असून, यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

deepavali 2024diwali lakshmi puja vidhi 2024 at homeLakshmi Pujan 2024 Vidhi In Marathiदिवाळी 2024लक्ष्मी पूजन कसे करावे
Comments (0)
Add Comment