Maharashtra Live News Today: वाचा बुधवार २३ ऑक्टोबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Nilesh Rane in Shivsena : निलेश राणेंच्या प्रवेश कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी लाडकी बहीण योजनेतील महिलांना अधिकाऱ्यांकडून सक्ती

निलेश राणेंच्या पक्षप्रवेशासाठी उद्या बुधवारी २३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुडाळ येथे येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहून गर्दी जमविण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना अधिकाऱ्यांकडून सक्ती केली जात आहे.महिला बचत गटांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सक्तीचे मेसेज पाठवले जात आहेत. त्यावर महिला सदस्यांनी विचारणा केली असता वरून (अधिकाऱ्यांकडून) मेसेज आल्याचे सांगितले जात आहे.

Source link

Comments (0)
Add Comment