मनसेचा माईंड गेम, जळगावातून डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर..! – Kesariraj

‘ती’ २० दिवसांपूर्वीची भेट आणि आता थेट विधानसभेच्या रिंगणात

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : सध्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्यामुळे सर्वत्र राजकीय पक्षांची धावपळ उडाली आहे. त्यातच आता जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजूमामा भोळे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व तसेच माजी नगराध्यक्ष के. डी. पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनुज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

Oplus_131072

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी त्यांची ४५ मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केली.(केपीएन)यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून तर पुण्यातील खडकवासल्याचे गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यातच खानदेशातील फक्त जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर झाला आहे. ही उमेदवारी त्यांनी डॉ. अनुज पाटील यांना दिली आहे.

जळगाव शहरात लेवा पाटीदार समाजाचे मोठे प्राबल्य असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा कल हा लेवा उमेदवार देण्याकडे असतो. (केपीएन)भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी आता जयश्री महाजन प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रकारे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लेवा पाटीदार समाजाचे तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेले डॉ. के. डी. पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नवीन सस्पेन्स निर्माण झाला आहे.

याबाबत डॉ. अनुज पाटील यांच्याशी “केसरीराज”ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या २ ऑक्टोंबर रोजी राजसाहेबांशी आमची भेट झाली. यानंतर जळगाव शहराची दुर्दशा आम्ही साहेबांना सांगितली. जळगाव शहरात बेरोजगारी वाढली. आयटी सेक्टर नाही. जे व्यवसाय आहेत त्यांची प्रगती होत नाही. एमआयडीसी असून ती विकसित होत नाही. अशा अडचणी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आहे.(केपीएन) हे दूर करण्यासाठी माझे स्वतःचे प्रयत्न राहणार आहेत. शहरातील समस्या सोडवण्याकरिता मी उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी “केसरीराज”ला सांगितले.

Source link

Comments (0)
Add Comment