भाजपला ठेच, शिवसेना शहाणी; उमेदवार यादीतील ‘त्या’ तीन चुका शिंदेंनी टाळल्या

Eknath Shinde Shiv Sena Candidates Vidhan Sabha: शिवसेनेच्या यादीत घराणेशाहीचे शिलेदारांचा देखील समावेश आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • शिवसेना (शिंदे गट) पहिली यादी जाहीर
  • शिवसनेने त्या चुका टाळल्या
  • अल्पसंख्यांक उमेदवारांना दिली संधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शिवसेना उमेदवार पहिली यादी

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपनंतर महायुतीमधील उमेदवारी जाहीर करणारा शिंदे गट हा दुसरा पक्ष ठरला आहे. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी भाजप आणि शिवसेना यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बऱ्याच विद्यमान आमदारांची जागा फिक्स आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केली तेव्हा त्यांनी ज्या चुका केल्या होत्या, त्या चुका युतीतील शिवसेनेने (शिंदे गट) टाळल्या आहेत. पहिली गोष्ट तर शिवसेनेने त्यांची पहिली यादी ही मराठीतून जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत काही नावे हिंदीत असल्याचं समोर आलं होतं. दुसरी गोष्ट शिवसेनेच्या यादीत औरंगाबाद या मतदारसंघाच्या नावाचा संभाजीनगर असाच उल्लेख करण्यात आला आहे, तर भाजपच्या यादीत औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला होता. शिवसेनेच्या पहिल्या यादीत बऱ्याच विद्यमान आमदारांची जागा फिक्स झाली आहे. तसेच बऱ्याच अल्पसंख्यांक उमेदवारांना देखील शिवसेनेने संधी दिली आहे.

Devendra Fadnavis : जगदीश मुळीकांची देवेंद्र फडणवीसांशी भेट, सागर बंगल्यावर खलबतं, अखेर स्टेटसमुळे भुवया उंचावल्या

शिवसेनेच्या यादीत घराणेशाहीच्या शिलेदारांचा देखील समावेश आहे. जोगेश्वरी येथून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा, उदय सामंत यांचे बंधू किरण यांनाही राजापूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. खानापूर येथून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान आमदार योगेश कदम हेही माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास यांना पैठण येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक उमेदवारांची यादी

१. साक्री (अज) – मंजूळाताई गावित

२. चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे

३. मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर

४. दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ

५. भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर

६. छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट

७. कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

eknath shinde assembly candidate listlatest marathi newsmaharashtra assembly election 2024shiv sena candidates first listएकनाथ शिंदे विधानसभा उमेदवार यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकलेटेस्ट मराठी बातम्याशिवसेना उमेदवार पहिली यादी
Comments (0)
Add Comment