शिंदेंना बंडात साथ, तरी तीन आमदार गॅसवर, सलग तीन टर्म निवडून आलेला दिग्गजही वेटिंगवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीआधी शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये शिंदेंना बंडात साथ दिलेल्या तीन आमदारांच्या नावांची पहिल्या यादीमध्ये घोषणा झालेली नाही. कोण आहेत ते आमदार जाणून घ्या.

हायलाइट्स:

  • शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर
  • बंडात साथ दिलेल्या तीन आमदारांच्या नावांचा समावेश नाही
  • तिन्ही आमदार वेटिंगवर, नेमकं काय कारण?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काही जागांवर पेच पाहायला मिळाला होता. मात्र महायुतीमधील भाजपने आपली यादी जाहीर केल्यानंतर आता शिंदे गटानेही पहिल्या यादीमध्ये ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बंड केल्यानंतर आता एकनाथ शिंदेंची पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या यादीमध्ये तीन असे विद्यमान आमदार आहेत ज्यांनी बंड केल्यावर शिंदेंना साथ दिली होती. मात्र पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चां उधाण आलं आहे.शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली आहे. मात्र यात अंबरनाथ मतदारसंघातून मागील सलग तीन टर्म आमदार असलेल्या डॉ. बालाजी किणीकर यांचे नाव नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्ये किणीकरांचा समावेश होता. बालाजी किणीकर यांना शिवसेना शिंदे गटातल्याच एका मोठ्या गटाचा विरोध असून किणीकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. कदाचित त्यामुळेच तर किणीकर यांची उमेदवारी लांबणीवर पडली नाही ना? अशी चर्चा सध्या अंबरनाथमध्ये सुरू आहे.

दुसरे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आहेत. विश्वनाथ भोईर यांना त्यांच्याच पक्षातुन आव्हान मिळताना दिसत आहे. कल्याण मधील शिंदेच्या सेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी सभागृहनेता रवी पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी केली असून त्यानी स्वतःचा प्रचारही सुरु केला आहे. भाजप माजी आमदार नरेंद्र पवारही कल्याण मधून निवडणूक लढण्यासं इच्छुक आहे. त्यामुळे भोईर यांची उमेदवारी लांबणीवर पडली नाही ना? अशी चर्चा सध्या कल्याणमध्ये सुरू आहे.

दरम्यान, या यादीमधील तिसरे नाव भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे शांताराम मोरे आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये शांताराम मोरे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. शिदेंनी बंड केले तेव्हा मोरेंनीही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता या तिन्ही आमदारांना दुसऱ्या यादीमध्ये तिकिट मिळते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

CMEknath Shindeshivsena candidate listअंबरनाथएकनाथ शिंदे शिवसेनेची पहिली यादीविधानसभा निवडणूक २०२४विश्वनाथ भोईर
Comments (0)
Add Comment