MVA Seat Sharing : फेसबुकवर चेतन दीक्षित यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या संभाव्य जागावाटपावरुन तिरकस बाण मारला आहे. भाजपसोबत युतीत लढताना दीडशेपार लढणारी शिवसेना महाविकास आघाडीत दोन आकडी जागांवर येण्याची शक्यता आहे.
हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन मोठ्या पक्षांची एकत्रित आघाडी आहे, ज्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांना जागावाटपात विलंब होत आहे.
- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.
- संजय राऊत यांनी शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा इरादा व्यक्त केला असून, जागावाटपाच्या निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.
ठाकरे गटाचं काय?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या सरशीची पुनरावृत्ती होणार, की महायुती महाराष्ट्रातील सत्ता कायम राखणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फटका बसणार की फायदा होणार, यावरही सर्वांचा नजरा टिकून राहिल्या आहेत.
फेसबुक पोस्ट व्हायरल
दरम्यान, फेसबुकवर चेतन दीक्षित यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या संभाव्य जागावाटपावरुन तिरकस बाण मारला आहे. भाजपसोबत युतीत लढताना दीडशेपार लढणारी शिवसेना महाविकास आघाडीत दोन आकडी जागांवर येण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray : युतीत ‘सडताना’ तीन आकडी जागा, आघाडीत ठाकरेंच्या वाट्याला ९० च? ३० वर्षांचा इतिहास पाहा
युतीत शिवसेनेला किती जागा मिळत गेल्या?
२०१९ ला तेव्हाच्या शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. – ५६ आमदार निवडून आले
२०१४ चा युती नव्हतीच, शिवसेनेने २८६ जागा लढवल्या होत्या – ६३ जागा जिंकल्या
२००९ मध्ये ठाकरेंना १६० जागा मिळाल्या होत्या – ४५ जागांवर विजय
२००४ ला १६३ जागा सेनेने लढवल्या होत्या – ६२ उमेदवार विजयी
१९९९ साली १६१ जागांवर शिवसेनेचे उमेदवार होते – ६९ जागा जिंकल्या
१९९५ मध्ये १६९ जागी शिवसेना लढली होती – ७३ जागांवर विजय
यंदा ठाकरे गटाला ९० ते ९५ जागा मिळण्याचे संकेत मिळत आहे. संजय राऊत यांनी सेंच्युरी मारण्याचं सूचक वक्तव्य करत १०० हून अधिक जागा लढवून शंभरपार जागा जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. त्यामुळे जागावाटपात काय होणार, हे लवकरच समजेल.