ताटातलं वाटीत आलं अन् आमदाराचं तिकीट गेलं; दादांचा निष्ठावंताला धक्का, पटेलांचा पुन्हा डाव

राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांनी जवळपास सगळ्याच आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पण अर्जुनी मोरगावचे आमदार चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गोंदिया: महायुतीमधील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजप, शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादीची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यात ३८ जणांचा समावेश आहे. शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुती सरकारमध्ये गेलेल्या जवळपास सगळ्याच आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे. पण अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जागी काल पक्षात आलेल्या राजकुमार बडोलेंना संधी देण्यात आली आहे.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कालच राष्ट्रवादीत प्रवेश केला. फडणवीस सरकारच्या काळात बडोले यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार होता. २०१९ मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे अवघ्या ७१८ मतांनी विजयी झाले. आता त्याच चंद्रिकापुरेंचा पत्ता कापून बडोलेंनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवली आहे.
Ajit Pawar: शिंदे, फडणवीसांची अजित पवारांशिवाय बैठक; दादांना भाजपकडून ‘मेसेज’; DCM तातडीनं दिल्लीला
अर्जुनी मोरेगाव मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल पटेल याच जिल्ह्यातून येतात. चंद्रिकापुरेंना गेल्या वेळी तिकीट मिळवून देण्यात पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. आताही राजकुमार बडोलेंच्या पक्षप्रवेशात आणि त्यांना तिकीट देण्यात पटेल यांनी भूमिका पार पाडली आहे. बडोलेंच्या पक्षप्रवेशावेळी पटेल त्यांच्या अगदी शेजारीच उभे होते.
MVA Seat Sharing: ये बंदा लई जोरात, मविआला पावले थोरात; जागावाटप ठरलं; काँग्रेस, ठाकरे, पवारांना किती जागा?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९९९ आणि २००४ मध्ये अर्जुनी मोरगावातून पक्षाचा उमेदवार विजयी झाला. पण २००९ आणि २०१४ मध्ये भाजपच्या बडोलेंनी बाजी मारली. २०१९ मध्ये त्यांचा विजय अगदी थोडक्यात हुकला. आता तर विद्यमान आमदाराला डावलून त्यांना संधी देण्यात आलेली आहे. चंद्रिकापुरेंबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे. शेती, विजेशी संबंधित प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत. त्यांचा जनसंपर्कही फारसा नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिल्यास पराभव होईल असे अहवाल राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळेच त्यांना डच्च देण्यात आला आहे. बडोले भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानं ताटातून वाटात गेल्याची चर्चा आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionMaharashtra Political NewsMaharashtra politicsअजित पवारअजित पवारांनी तिकीट कापलेभाजपमनोहर चंद्रिकापुरेराजकुमार बडोलेराष्ट्रवादी काँग्रेस
Comments (0)
Add Comment