Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024: विधानसभा निवडणुकीसाठी माहीममधून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या अमित यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला असून जर त्यांनी विजय मिळवला तर तो ऐतिहासिक ठरेल.
१९९० पासून माहीम हा शिवसेनाचे बालेकिल्ला राहिला आहे. १९९० ते २००४ अशी सलग चार टर्म सुरेश गंभीर हे विजय झाले होते. त्यानंतर २००८ साली मतदासंघाची पूनरर्चना झाली आणि २००९ साली नितीन सरदेसाई यांनी मनसेच्या तिकीटावर विजय मिळवला. २०१४ आणि २०१९ साली हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनाच्या ताब्यात आला. सदा सरवणकर यांनी बाजी मारली. आता २०२४ ला येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. जर त्या दिवशी अमित ठाकरे यांनी माहीममधून बाजी मारली तर तो एक ऐतिहासिक विजय ठरेल. याचे कारण म्हणजे हा मतदारसंघातील परिसर होय.
माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. इतक नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ज्या शिवाजी पार्क मैदानावर केली ते देखील याच मतदारसंघात येते. जर अमित ठाकरे विजयी झाले तर ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य असतील जे शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क या शिवसेनेशी संबंधित खास असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील.
अमित ठाकरेंच्या विजयासाठी राज ठाकरे आणि संपूर्ण मनसे मैदानात उतरेल. त्यांच्या समोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल. या मतदारसंघात काय निकाल लागतो यासाठी २३ नोव्हेंबरची वाट पहावी लागले.