‘मला वाटलं माझा रमेश आला, राजसाहेबांना अश्रू अनावर’; मयुरेश वांजळे यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

विधानसभा निवडणुकीआधी मनसेने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राज ठाकरेंनी दिवंगत आमदार गोल्डन मॅन रमेश वांजळे यांच्या मुलाला खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीसाठी मुयरेश वांजळे राज ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा राजसाहेबांना अश्रू अनावर झाल्याचं वांजळेंनी सांगितलं.

हायलाइट्स:

  • विधानसभा निवडणुकीआधी मनसेकडून आपली दुसरी यादी जाहीर
  • गोल्डन आमदार रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी
  • मयुरेश वांजळेंनी सांगितली राज ठाकरेंसोबतच्या भेटीची इनसाईड स्टोरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत पुणे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून किशोर शिंदे, हडपसर विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेचे स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर मयुरेश वांजळे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मयुरेश वांजळे हे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र ही तयारी करत असताना त्यांच्या बॅनरवर ना मनसेचा उल्लेख होता ना कोणत्या मनसे नेत्याची हजेरी त्यांच्या व्यासपीठावर होती. मात्र या मयुरेश वांजळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यकारणीच्या संपर्कात होते. इतकंच नाही तर त्यांनी राज ठाकरे यांचे गुप्त भेट देखील घेतली होती. ही मयुरेश वांजळे यांची राज ठाकरे यांच्यासोबतची पहिली भेट होती. या भेटीत नक्की काय झालं याची इनसाइट स्टोरी मयुरेश वांजळे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना सांगितली आहे.
‘अमित ठाकरेंऐवजी मनसेचा कार्यकर्ता असता तर…’; सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया काय?
मयुरेश वांजळे म्हणाले, ज्यावेळेस मी राज साहेबांना भेटायला गेलो तेव्हा मला पाहताच राजसाहेबांना अश्रू अनावर झाले, ते म्हणाले मला वाटल माझा रमेशचं आला. ते नेहमी म्हणतात माझा वाघ गेला पण त्यांना मला समोर पाहून त्यांच्या त्याच वाघाचा छावा दिसला अन् त्यांना अश्रू अनावर झाले. राजसाहेबांची ही अवस्था पाहून मी प्रचंड भावुक झालो होतो. मात्र आम्ही ठरवलं आहे आपण आपल्या भावना दाबून ठेवायच्या. आता ज्या दिवशी मी जिंकेल त्याच दिवशी रडेल. कारण आम्ही रडणारे नाहीत तर लढणारे आहोत, असं वांजळे म्हणाले.
शिंदेंना बंडात साथ, तरी तीन आमदार गॅसवर, सलग तीन टर्म निवडून आलेला दिग्गजही वेटिंगवर
दरम्यान, राज ठाकरे यांनी मयुरेश वांजळे यांच्या भेटीमध्ये त्यांना अनेक प्रश्न केले. तुझं वय हे कमी आहे तू जर मनसेचे भविष्य असशील तर पुढचा तुझा रोड मॅप काय आहे. या राजसाहेबांच्या प्रश्नाला उत्तरं देताना मी पुढील 25 वर्षाचा विकासाचा रोड मॅप राज साहेबांसमोर ठेवला आणि त्यानंतरच माझ्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचं मयुरेश वांजळेंनी सांगितलं.

Source link

Mayuresh WanjaleMayuresh Wanjale Marathi NewsRamesh Wanjalevidhansabh election 2024मयुरेश वांजळेमयुरेश वांजळे मराठी बातम्याविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment