Naadbramha Idli Shop Owner Knife Attack On Workers : नादब्रम्ह इडली दुकानाच्या मालकाने पगार मागण्यासाठी गेलेल्या त्याच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
नादब्रम्ह इडली मालकाकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला
अलिबाग तालुक्यातील भाल येथील रहिवासी अक्षता दळवी (वय २२) आणि वायशेत येथील सायली मार्कील (वय २९) या दोघी जवळपास वर्षभरापासून नादब्रम्ह इडली दुकानाचे मालक राजेश कारिया यांच्याकडे कामाला होत्या. त्या दोघींनी मिळून काम सोडण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी कारिया यांना कळवलंही होतं. मात्र दोन दिवसांनी सांगा असं मालकाकडून सांगण्यात आलं. त्याप्रमाणे अक्षता, सायली मार्किल आणि तिचा पती रविंद्र मार्किल हे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले. यावेळी तरुणींनी कामाचा मोबदला मागितला.
मात्र नादब्रम्ह इडलीचा मालक कारिया याने पैसे पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देण्यात येईल, असं सांगितलं. यावरुन त्यांच्यात शाब्दिक मतभेद झाले. तसंच कारिया यांनी संतापाच्या भरात अक्षता आणि रविंद्र या दोघांवर धारदार चाकूने वार केले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पगार देण्यास टाळाटाळ, नंतर नादब्रम्ह इडली दुकान मालकाकडून कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला; घटनेने परिसरात खळबळ
पैसे देण्यास टाळाटाळ, नंतर चाकू हल्ला
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश कारिया असं हल्लेखोर व्यक्तीचं नाव आहे. शहरात त्याचे नादब्रम्ह नावाचं इडली विक्रीचं दुकान आहे. या दुकानात सायली मार्कील आणि अक्षता दळवी गेल्या वर्षभरापासून कामाला आहेत. त्यांनी काम सोडून देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी त्या कारिया यांना भेटल्या. तसंच आतापर्यंत राहिलेल्या पगाराची मागणी केली. कारीया यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पगार देईन सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून कारिया यांनी आपल्याकडे असलेल्या चाकूने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.